महाराष्ट्राच्या राजकारणात माध्यमांनी कितीही प्रयत्न करून चाणक्य प्रतिमा निर्मिती केली तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपात उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना तिसऱ्या क्रमांकावर ढकलून असलेल्या शिवसेनेला अव्वल क्रमांकावरच ठेवण्यात यश मिळवले, पण आता आपली घसरलेली तिसऱ्या क्रमांकावरची पत सावरण्यासाठी पवारांनी वेगळी क्लुप्ती लढवून आपणच लोकसभा निवडणुकीत कमी जागा घेतल्या. कारण लोकसभा निवडणूक हे आपले टार्गेटच नव्हते आपले “टार्गेट” विधानसभा निवडणूक आहे. तिथे आपल्याला जास्त जागा खेचायच्या आहेत, असा दावा केला. Pawar says, “It is our intention to get more seats in the Legislative Assembly
राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासात शरद पवार प्रथमच लोकसभा निवडणुकीत फक्त 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे करू शकले आहेत. महाविकास आघाडीतल्या जागा वाटपात फक्त 10 जागा येऊन देखील पवारांना एका झटक्यात त्या 10 जागांवरचे उमेदवार जाहीर करता आले नाहीत. 5 – 3 – 2 असे पत्ते पिसत पवारांनी कसेबसे आपले 10 उमेदवार जाहीर करून दाखवले. तोपर्यंत शिवसेनेने 22 उमेदवार जाहीर करून प्रचार देखील सुरू केला होता. काँग्रेस देखील आपल्या 17 जागांवरचे उमेदवार जाहीर करून बसली होती. पण पवारांना 10 जागांवर उमेदवार उभे करताना इकडच्या तिकडच्या पक्षांमध्ये पाहून राजकीय उधार उसनवारी करावी लागली.
“हा” म्हणे शरद पवार पॅटर्न; पावसात उभे राहून भाषण करायची आलीय फॅशन!!
यातून पवारांना बारामती वर कॉन्सन्ट्रेट करता आले आणि नंतर माढात लक्ष घालता आले. पण तिथे देखील पवारांकडे नव्या समाज घटकांमधले नवे नेते किंवा कार्यकर्ते आले, असे चित्र उभेच राहिले नाही. त्या उलट पवारांना विजयसिंह मोहिते पाटलांचा जुन्याच नेत्यांशी जुळवाजुळव करून माढ्यातला उमेदवार द्यावा लागला आणि नगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला आमदार फोडून तिथे उमेदवार उभा करावा लागला. पवारांच्या राजकीय जीवनात एवढे “राजकीय हाल” पवारांचे कधी झाले नव्हते. पवारांच्या बाबतीत नेतृत्व “राष्ट्रीय” आणि पक्ष उप – उपप्रादेशिक ही बिकट अवस्था झाली.
पण आपली अवस्था बिकट झाली हे कबूल करण्यापेक्षा पवारांनी त्यावर देखील मात करणारी मखलाशी सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणूक हे “टार्गेट”च नाही, तर विधानसभा निवडणूक हे “टार्गेट” आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कमी जागा घेऊन विधानसभा निवडणुकीत जास्त जागा खेचून घेण्याचा आपला इरादा त्यांनी अहमदनगर मध्ये बोलून दाखविला. पवारांनी हे वक्तव्य जाता जाता केले असले तरी त्यामध्ये महाविकास आघाडीत आणि खुद्द पवारांच्या राष्ट्रवादीतच राजकीय बॉम्बची पेरणी करण्यासाठी पुरेसे ठरले. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस त्यामुळे ॲलर्ट वर आले. ज्या पवारांना उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानायला लावले ते विधानसभा निवडणुकीत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर खेचून घेतली ही शक्यता तरी आहे का??, हा खरा सवाल आहे. कारण उद्धव ठाकरेंचे लोकसभा निवडणुकीतले यशापयश हे पवारांसारखे एखाद्या मतदारसंघापुरते मर्यादित नाही.
उद्धव ठाकरेंचे सगळे उमेदवार जरी पडले तरी पवारांच्या बारामतीतल्या पराभवासारखा “ठपका” ठाकरेंवर लागण्याची शक्यता नाही. उलट पवार जर आपल्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस बारामतीत हरले, म्हणजेच सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला, तर मात्र पवारांची महाराष्ट्रातली “चाणक्य” ही प्रतिमा तर उद्ध्वस्त होईलच, पण उरली सुरली राजकीय पत आणि किंमत देखील संपुष्टात येईल. मग पवारांनी आपले “टार्गेट” लोकसभा निवडणूक नव्हतेच. विधानसभा निवडणूक होते, अशा कितीही गमजा मारल्या तरी विधानसभा निवडणुकीतल्या जागा वाटपात महाविकास आघाडीत पवारांचा शब्द प्रमाण मानला जाईल, ही शक्यता दुरापास्त होऊन जाईल. उलट बारामतीतल्या पराभवानंतर ठाकरे आणि काँग्रेस भले आपापसांत भांडतील, पण ते पवारांवर वरचष्मा गाजवून पवारांच्याच पक्षाला खिंडार पाडून आपल्या उमेदवारांची भरती करतील ही दाट शक्यता आहे.
जरांगे आंदोलनातून इंधन पुरवठ्याचा अभाव
मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या निमित्ताने पवारांच्या उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मनुष्यबळाचा इंधनपुरवठा होईल, असा सुरुवातीला त्यांचा होरा होता. या निमित्ताने पवार नव्या तरुण चेहऱ्यांना निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देतील, असे त्यांचेच नेते सांगत होते. परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. उलट मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमधील आक्रमक वक्तव्ये सोडली, तर बाकी लोकसभा निवडणुकीत कुठली राजकीय किंमतच उरवली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ज्यादा जागा खेचून घेण्यासाठी पवार जर मनोज जरांगे यांच्या आंदोलनातल्या मनुष्यबळाच्या इंधनावर अवलंबून राहणार असतील, तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपातले यश त्यांचे त्यांनाच लख लाभ होईल!!
बाकी महायुतीत अजित पवारांची “अवस्था” यापेक्षा फारशी वेगळी नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App