Manoj Jarange : फडणवीसांना ठोकताना जरांगे “माधव पॅटर्न” वर घसरले; मास्टर माईंडचे राजकारण जुन्या वर्चस्ववादी वळणावर आले!!


Manoj Jarange मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सहाव्यांदा केलेले उपोषण नवव्या दिवशी सोडताना नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केले, पण फडणवीस यांना ठोकताना ज्या पद्धतीने मनोज जरांगे भाजपच्या “माधव पॅटर्न” वर घसरले, ते पाहता त्यांनी किंबहुना त्यांच्या मार्फत त्यांच्या मास्टर माईंडने राजकारण जुन्या वर्चस्ववादी वळणावर आणल्याचे उघड्यावर आले. Manoj jarange’s mastermind want to bring back maratha dominance in maharashtra politics

मनोज जरांगे यांना दोनच दिवसांपूर्वी तिसऱ्या आघाडीचे नेते संभाजी राजे छत्रपती भेटून गेले होते. मनोज जरांगे यांनी तिसऱ्या आघाडीत यावे, असे त्यांनी त्यावेळी आवाहन केले होते ओबीसी मधून मराठा आरक्षणाच्या विषयाला त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे मनोज जरांगे तिसऱ्या आघाडीच्या गळाला लागणार, अशा अटकळी राजकीय वर्तुळात बांधल्या गेल्या होत्या. परंतु काल मध्यरात्री 12.00 वाजता शरद पवारांचे समर्थक आमदार राजेश टोपे अचानक अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांना भेटले. त्यानंतर जरांगे यांनी रात्री वैद्यकीय उपचार घेतले आणि सकाळी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.

मनोज जरांगेंचा आक्षेप

त्याचवेळी मनोज जरांगे यांनी भाजपच्या “माधव पॅटर्न” वर पहिल्यांदाच आक्षेप घेतला. गेल्या काही महिन्यांमध्ये जरांगेंनी फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फारसे बोलतच नव्हते. टीका केलीच तर जाता जाता केली, अन्यथा फडणवीसांनाच झोडपले, हा प्रकार मनोज जरांगे नियमितपणे करत होते आजही त्यांनी फडणवीसांना टार्गेट केले. पण आज पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी भाजपच्या “माधव पॅटर्न”ला टार्गेट केले. यामागचे नेमके गौडबंगाल काय??, असा सवाल तयार झाला. त्या सवालाचे “उत्तर” अंतरवाली सराटीतल्या दोन दिवसांच्या घडामोडीत तर नाही ना??, असाही उपसवाल तयार झाला.


Mayawati : ‘आरक्षणाबाबत दुटप्पी धोरण’, म्हणत मायावतींनी राहुल गांधींवर केली टीका


1990 “माधव पॅटर्न”

कारण मूळात जो “माधव पॅटर्न” (म्हणजे माळी धनगर आणि वंजारी) महाराष्ट्रात तयार झाला, तो 1990 च्या दशकामध्ये महाराष्ट्रातल्या मराठा वर्चस्ववादी राजकारणाला काटशह देण्यासाठी. तो भाजपने तयार केला किंवा अन्य कुठल्या पक्षाने तयार केला, हा भागच अलहिदा आहे, पण मूळात “माधव पॅटर्न” तयार झाला, तो महाराष्ट्रात 1960 ते 1990 या कालावधीत काँग्रेसी विचारसरणीच्या नेत्यांनी राबविलेल्या वर्चस्ववादी राजकारणाला धक्का देण्यासाठीच!! ही वस्तुस्थिती कितीही टोचणारी असली तरी बदलत नाही. आणि मनोज जरांगे यांच्या आजच्या वक्तव्यातून अशी टोचणारी वस्तुस्थिती उघड्यावर आली.

काँग्रेसी “साहेबी” प्रवृत्ती

महाराष्ट्रात काँग्रेसी विचारांचा दबदबा असताना टप्प्याटप्प्याने मराठा वर्चस्ववादी राजकारण तयार झाले. त्यावेळी दुसरा कुठलाही समाज घटक कितीही मोठा अथवा छोटा असो, तो राजकारण किंवा सत्ताकारण करण्याचा विचारही करू शकत नव्हता. हा तो काळ होता, ज्यावेळी काँग्रेसी विचारसरणीच्या नेत्यांनी महाराष्ट्रात “साहेबी” राजकारण प्रस्थापित केले. महाराष्ट्रात जे कोणी “साहेब” असतील, ते फक्त काँग्रेसीच असतील. विरोधी पक्षांच्या कुठल्याही नेत्यांना “साहेब” हे नामाभिधान देखील द्यायचे नाही, असा राजकीय अहंकार त्यावेळी शिखरावर होता. अन्य कुठल्याही समाज घटकातील नेते कुठल्याही पदावर असतील, तरी ते “साहेब” असणार नाहीत, याची पुरेपूर चौकट काँग्रेसी विचारसरणीच्या नेत्यांनी आखली होती. त्यातूनच त्यांचे वर्चस्ववादी राजकारण प्रस्थापित झाले होते.

जातीवर्चस्वाला धक्का

1985 नंतर भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन आणि शिवसेनेतून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या माध्यमातून काँग्रेसी वर्चस्ववादी राजकारणाला धक्का द्यायला सुरुवात केली. त्यावेळी भाजप किंवा शिवसेनेमध्ये प्रस्थापित वर्चस्ववादी समाज घटक येणे शक्यच नव्हते. तसे ते आलेही नाहीत. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना इतर समाज घटकांमधून नेते तयार करावे लागले. त्यांनी तसे नेते तयार केले आणि त्यातून जो बनला, तो “माधव पॅटर्न” ठरला. या “माधव पॅटर्न”च्या निमित्ताने महाराष्ट्राची राजकीय समरसतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. महाराष्ट्रात मराठेतर इतर छोटे – मोठे समाज घटक राजकारणाचा आणि सत्ताकरणाचा विचार करू लागले. टप्प्याटप्प्याने इतर समाज घटकांमधल्या नेत्यांनी आपापले राजकीय कर्तृत्व सिद्ध केले. त्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, मनोहर जोशी, छगन भुजबळ, नारायण राणे ही नावे आघाडीवर आली. या नेत्यांनी महाराष्ट्रात परिणामकारकपणे काँग्रेसी मराठा वर्चस्ववादी राजकारणाला धक्का दिला. नारायण राणे जरी मराठा असले तरी त्यांनी जाती वर्चस्वातून आपले नेतृत्व प्रस्थापित केले नाही, तर आधी बाळासाहेब ठाकरेंच्या आणि नंतर अन्य पक्षांच्या सावलीत राहून नेतृत्व प्रस्थापित केले.

– “माधव पॅटर्न”ची राजकीय समरसता

“माधव पॅटर्न” मधून तयार झालेले नेतृत्व वर्चस्ववादापेक्षा सर्वसमावेशकतेच्या दिशेने पावले टाकत दमदारपणे पुढे गेले. त्यातूनच महायुती नावाची “पॉलिटिकल एन्टीटी” अस्तित्वात आली. आज तीच मनोज जरांगे यांच्या मास्टर माईंडला खटकत आहे. म्हणूनच मनोज जरांगे यांच्या तोंडी पहिल्यांदाच “माधव पॅटर्न”वर जातीवादाचा शिक्का मारायचा प्रयत्न झाला आहे. पण याचा खरा अर्थ हाच की मनोज जरांगे यांच्या मास्टर माईंडचे राजकारण तथाकथित पुरोगामी वळणावरून जुन्या वर्चस्ववादी वळणावर आले आहे. पण आता महाराष्ट्रातील नद्यांमधून बरेच राजकीय पाणी वाहून गेले आहे. “माधव पॅटर्न” महाराष्ट्रात पुरेसा बळकट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे तो बळकट झाल्यानंतर जरांगे यांच्या मास्टर माईंडला जुने वर्चस्ववादी राजकारण पुन्हा जसेच्या तसे सुरू करता येईल आणि ते रुजेल याची कुठलीही गॅरंटी नाही!!

Manoj Jarange mastermind want to bring back maratha dominance in maharashtra politics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात