Jammu elections : उमर अब्दुल्ला राहुल गांधींवर “सौम्य” चिडले, याचा अर्थ त्यांचे घराणे पहिल्यांदाच जम्मूतल्या निवडणुकीला “घाबरले”!!

जम्मू कश्मीर मधल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातले मतदान सुरू असताना माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया समोर आली. त्यात ते अत्यंत सभ्य भाषेत राहुल गांधींवर “सौम्य” चिडले. याचा अर्थ पहिल्यांदाच उमर अब्दुल्ला आणि त्यांचे घराणे पहिल्यांदाच जम्मूतल्या निवडणुकीला घाबरले!! जी जम्मू – काश्मीरच्या राजकीय इतिहासातली सर्वांत महत्त्वपूर्ण घटना ठरू शकते.

उमर अब्दुल्लांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियातले “बिटवीन द लाईन्स” नीट वाचले, तर याचा नेमका अर्थ समजू शकेल. राहुल गांधींनी काश्मीरमध्ये येऊन प्रचार केला, ही गोष्ट चांगलीच झाली, पण आता मला आशा वाटते की ते जम्मूतल्या प्रचारावर लक्ष केंद्रित करतील. कारण काँग्रेसने काश्मीरमध्ये काय केले हे तितकेसे महत्त्वाचे नाही, पण जम्मूत काँग्रेस काय करणार आहे, त्याला विशेष महत्त्व आहे. कारण जम्मू मध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक जागा आहेत. जम्मू मधल्या पठारी प्रदेशामध्ये आमच्या अपेक्षेनुसार काँग्रेसने अद्याप काम केलेले दिसत नाही, अशी प्रतिक्रिया उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.

… आणि या प्रतिक्रियेतच नेमकी जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीची “राजकीय मेख” दडली आहे. अब्दुल्ला घराण्यातील एखाद्या नेत्याला पहिल्यांदाच जम्मू मधल्या निवडणुकीची “भीती” वाटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. केंद्रातल्या मोदी सरकारने 370 कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मतदार संघाची फेररचना झाली. त्यामध्ये जम्मू विभागातले 6 मतदारसंघ वाढले, तर काश्मीरमध्ये 1 मतदारसंघ वाढला. लडाख पूर्ण वेगळा होऊन तो केंद्रशासित प्रदेश आधीच बनविला. त्यामुळे ही राजकीय फेररचना जम्मू-काश्मीर मधल्या राजकीय घराण्यांना हादरा देऊन गेली.


PMRDA : पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजूरी


आत्तापर्यंत कुठल्याही आणि केव्हाही निवडणूका येवोत, काश्मीर खोऱ्याच्या बळावर सत्ता हस्तगत करायची आणि संपूर्ण जम्मू काश्मीर राज्यावर सत्ता गाजवायची हा जम्मू-काश्मीर मधल्या राजकीय घराण्यांचा खाक्या होता. पण 2024 ची विधानसभा निवडणूक नव्या मतदारसंघ फेररचनेनुसारच विद्यमान होत आहे. याचा हादरा बसल्यानेच उमर अब्दुल्लांनी संयमित भाषेत काँग्रेसला सुनावले. उमर यांची भाषा संयमित आहे, पण त्या मागची “भीती” मात्र मोठी आहे, हे उघडपणे दिसून आले.

अब्दुल्ला घराण्याच्या नॅशनल कॉन्फरन्सचा काश्मीर खोऱ्यात विशिष्ट प्रभाव आहे, पण आता तिथल्या जागांना काटशह देण्यासाठी जम्मूतल्या जागा वाढल्या आहेत. याचीच नेमकी अब्दुल्लांना भीती वाटते आहे. म्हणूनच जम्मू मधल्या सर्वाधिक जागांवर काँग्रेसने काम करावे अशी त्यांची इच्छा आहे. पण ती इच्छा फलद्रूप झाली नसल्याची नाराजी उमर अब्दुल्लांच्या वक्तव्यातून उघड झाली.

काश्मीर मधल्या मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदान सुरू असताना अब्दुल्लांनी राहुल गांधी आणि काँग्रेस विषयी नाराजी व्यक्त केल्याने त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्स मधली अस्वस्थता तर बाहेर आलीच, पण जम्मू काश्मीरची सत्ता हस्तगत करायची असेल, तर इथून पुढे फक्त काश्मीर खोऱ्यावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. जम्मू मधल्या आमदारांच्या वाढलेल्या संख्येचा आधार घ्यावा लागेल. त्यामुळे जम्मूतल्या नेत्यांना वर्षानुवर्षे देत होते तशी दुय्यम दर्जाची वागणूक देऊन चालणार नाही. त्यांना सत्तेत तेवढाच तोलामोलाचा वाटा द्यावा लागेल. जम्मू विभागाला काश्मीर विभागा इतकेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त राजकीय महत्त्व द्यावे लागेल, याची सल त्या वक्तव्यातून उघड्यावर आली आहे.

जम्मू – काश्मीर मधून 370 कलम हटवून तिथल्या मतदारसंघांची संपूर्ण फेररचना केल्याने तिथल्या राजकीय घराणेशाहीची हेकडी काढून टाकल्याने हे घडले आहे. निवडणूक निकालानंतर त्याचे खरे परिणाम दिसणार आहेत.

For the first time Abdullah family feared of Jammu elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात