आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा नेमका अर्थ काय काय हे कळतंय का…??, हे मनसे आणि भाजपने समजून घेण्याची गरज आहे. एकीकडे मनसे आणि भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांना टार्गेटवर घेत असताना उद्धव ठाकरे यांनी त्यापासून अलगद बाजूला होत किंबहुना आपणा स्वतःला मनसे आणि महाराष्ट्र भाजपच्या सर्वोच्च नेत्यांपेक्षा “वरचे” स्थान देत त्यांच्याशी असलेला संघर्ष हा आदित्य ठाकरे यांच्या लेव्हलला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एक पायरी खाली आणून ठेवला आहे. किंबहुना मनसे आणि भाजपच्या प्रादेशिक नेत्यांच्या बरोबरीचा शिवसेनेचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे नव्हे, तर आदित्य ठाकरे यांना समोर आणण्याचा हा राजकीय डाव आहे…!! Do you know the exact meaning of Aditya Thackeray’s visit to Ayodhya?
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आपण अयोध्या दौरा करणार असल्याचे जरूर सांगितले, पण त्यांनी तारीख जाहीर केली नाही. नेमका याच गोष्टीचा फायदा उचलत आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख नव्हे, पण निदान महिना तरी शिवसेनेने जाहीर केला आहे. मूळात नाशिक शहर आणि जिल्हा शिवसेने पुरताच असलेला अयोध्या दौरा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रव्यापी करण्याची चलाखी शिवसेनेने दाखवली आहे. महाराष्ट्रातली शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येला गेली हे दाखविण्याचा हेतू उघड आहे.
याचाच दुसरा अर्थ असा की उद्धव ठाकरे हे मनसेच्या सर्वोच्च नेत्यांच्या आणि भाजपच्या प्रादेशिक नेत्यांच्या “वरच्या पातळीवरचे” नेते आहे, तर आदित्य ठाकरे हे मनसे आणि भाजपच्या नेत्यांच्या बरोबरीचे नेते आहेत हे दाखवून देण्याचा यातून प्रयत्न करण्यात येतो आहे.
अर्थात ही गोष्ट सध्या पर्सेप्शन लेव्हललाच आहे. प्रत्यक्षात स्ट्रॅटेजी लेव्हलला उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे महाराष्ट्रव्यापी नेते आहेत. परंतु, ही वस्तुस्थिती असली तरी आदित्य ठाकरे हे राज्याचे नेते आहेत हे पर्सेप्शन तयार करण्याचा हा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
एकाच वेळी राज ठाकरे यांना काटशह आणि त्याच वेळी भाजपच्या प्रादेशिक नेत्यांचा समोर आदित्य ठाकरे यांच्या रूपाने भले मग तो ठाकरे घराण्यातलाच का असेना पण नवा चेहरा समोर आणणे ही यातली खरी राजकीय खेळी आहे. जी अजून शरद पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला ही जमलेली नाही. सुप्रिया सुळे अथवा रोहित पवार यांना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या प्रमाणात देखील अद्याप पुढे आणणे पवारांना जमलेले दिसत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App