पवार बोले, माध्यमे डोले!! : राज ठाकरे जर “अदखलपात्र”, तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये पवारांची तीच उत्तरे पुन्हा – पुन्हा का…??


गुढीपाडवा मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ निर्माण केली. त्याच वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. राज ठाकरे यांच्या शरसंधानावर प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी राज ठाकरे यांना “अदखलपात्र” ठरवले होते. त्यांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. कारण त्यांच्या पक्षाचे हातावर बोटाच्या मोजण्याएवढे देखील उमेदवारी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत नाहीत, असे उलटे शरसंधान शरद पवारांनी त्यावेळी साधले होते.Pawar spoke, the media waved !! : If Raj Thackeray is “undetectable”, then Pawar’s same answers in the press conference again – why again

मात्र, जे राज ठाकरे शरद पवारांना त्यावेळी “अदखलपात्र” वाटले होते, त्यांच्यावर शरद पवार तीन वेळा प्रेस कॉन्फरन्स का घेतात…?? राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना किंवा राज ठाकरे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना शरद पवार प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्रत्युत्तरे का देतात…?? हे खरे प्रश्न आहेत. पण हे प्रश्न शरद पवारांना प्रेस कॉन्फरन्स मध्ये हा प्रश्न कोणी विचारत नाही. त्यामुळे ते त्यांची उत्तरे देत नाहीत.



राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. ठाण्याच्या उत्तर सभेत या मुद्द्यावरून शरद पवारांवर पुन्हा शरसंधान साधले. त्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील शरद पवार हे राज ठाकरे हे “अदखलपात्र” आहेत, असे पुन्हा सांगत 22 मिनिटे बोलले. आज 15 एप्रिल 2022 रोजी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये उत्तरे दिली. या कॉन्फरन्समध्ये देखील शरद पवार यांनी जेम्स लेन आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे मुद्दे लावून धरले.

जेम्स लेन प्रकरणाला पुन्हा उकळी

याचा अर्थ शरद पवारांना पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे – राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरे यांच्या निमित्त जेम्स लेन प्रकरणाला उकळी आणायची आहे का…?? ते विविध वर्तमानपत्रांची कात्रणे प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यासाठीच वाचून दाखवत आहेत का…?? यातून पवारांना महाराष्ट्र सामाजिक ध्रुवीकरण साधून राष्ट्रवादी काँग्रेसने गमावलेली वाट पुन्हा मिळवायची आहे का…??, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी फार मोठ्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करण्याची गरज नाही.

राष्ट्रवादीला “दखलपात्र” करण्याचा प्रयत्न

शरद पवारांच्या तोंडी कायम “धर्मनिरपेक्ष महाराष्ट्राचे आणि देशाचे ऐक्य” अशीच भाषा राहिली आहे, पण कृती मात्र नेहमीच सामाजिक ध्रुवीकरणातून राष्ट्रवादीच्या राजकीय लाभाची राहिली आहे. राज ठाकरे यांना “अदखलपात्र” ठरवून त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना तीन-तीनदा प्रेस कॉन्फरन्स मध्ये उत्तरे देऊन शरद पवार स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात जास्तीत जास्त “दखलपात्र” करण्याचा प्रयत्न करत आहेत, हीच यातली राजकीय वस्तुस्थिती आहे…!!आणि शरद पवारांचे हे राजकीय इंगित उघड करायला सध्याची प्रसारमाध्यमे “पॅकेजी तोबऱ्या”मुळे तयार होत नाहीत. हे यातले पुढचे राजकीय इंगित आहे.

पवारांना क्रॉस क्वेश्चनिंग नाही

अन्यथा शरद पवारांना आपणच राज ठाकरे यांना “अदखलपात्र” ठरवले, तर त्यांच्यावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे का देता??, असा प्रतिप्रश्न प्रसार माध्यमांचा प्रतिनिधींनी विचारला असता. फार तर या प्रश्नावर शरद पवार चिडले असते. कदाचित त्याच्याही बातम्या झाल्या असत्या. पण सध्याच्या प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी पवारांना “क्रॉस क्वेश्चनिंग” करतच नाहीत. त्यामुळे पवार जे म्हणतात ते प्रसार माध्यमे लिहितात. खरे म्हणजे “पॅकेजी तोबऱ्या”मुळे “पवार बोले आणि माध्यमे डोले” अशी स्थिती महाराष्ट्राची गेल्या अडीच वर्षात झाली आहे…!!

12 वा बाँबस्फोट” खोट्या वक्तव्याचे शरद पवारांकडून पुन्हा समर्थन!!

आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका पाठोपाठ एक केलेल्या 14 ट्विटला प्रत्युत्तर देताना मुंबईत 12 बाँबस्फोट झाला होता, या आपल्या खोट्या वक्तव्याचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे.

शरद पवार हे मुस्लिमांचे लांगूलचालन करतात हा आरोप करून देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या पुष्ट्यर्थ शरद पवार मुंबईतील बॉंबस्फोटांच्या वेळी खोटे बोलल्याचा आरोप केला होता. 1993 मध्ये मुंबईत प्रत्यक्षात 11 बॉम्बस्फोट झाले असताना 12 बॉम्बस्फोट झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते, याची आठवण करून दिली होती.

यासंदर्भात शरद पवार यांनी आपल्या जुन्या वक्तव्याचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे. शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप 100% खरा आहे. कारण त्यावेळी 11 बॉम्बस्फोट हिंदू वस्तीत झाले होते. त्यात सिद्धिविनायक मंदिरासारखे महत्त्वाची ठिकाणे होती. बॉम्बस्फोटात वापरलेले मटेरियल कराचीत बनत असल्याचे मला माहिती होते. याचा अर्थ परकीय शक्तींना भारतात हिंदू-मुस्लिम दंगल घडवायची होती. त्यामुळे मी मोहम्मद अली रोड परिसरात 12 बाँबस्फोट झाल्याचे खोटे सांगितले होते. त्या वक्तव्यात त्यावेळी काही चूक नव्हती. हिंदू-मुस्लिम दंगल टाळण्यासाठी ते वक्तव्य मी केले होते, असे समर्थन शरद पवारांनी आजही केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप नवीन नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस जातिवाद जोपासत नाही. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, मधुकरराव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जबाबदार पदांवर होते, असे वक्तव्य देखील शरद पवार यांनी केले आहे.

 पुरंदरेंनी जेम्स लेनचे समर्थन केल्याचा दावा

त्याच वेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेनचे समर्थन केल्याचा दावाही शरद पवार यांनी यावेळी केला. यासाठी त्या वेळच्या काही बातम्या त्यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्या. मात्र, त्या बातम्या कोणत्या वर्तमानपत्रात आल्या होत्या, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

मनसे आता हिंदुत्वाच्या दिशेने निघाली आहे. स्वतःच्या पक्षाचे धोरण ठरवण्याचा राज ठाकरे यांना अधिकार आहे. मात्र जनतेने त्यांच्या पक्षाविषयी धोरण गेल्या निवडणुकीत घेतले, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

Pawar spoke, the media waved !! : If Raj Thackeray is “undetectable”, then Pawar’s same answers in the press conference again – why again

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात