महाराष्ट्रात 23 आणि 12 उमेदवार जाहीर करून भाजप – काँग्रेसची आघाडी; पवारांची नुसतीच “माध्यमी चाणक्यगिरी”!!


नाशिक : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजून अनेक दिवस उलटले त्यानंतर भाजपने दोन टप्प्यांमध्ये 48 पैकी तब्बल 23 जागांवरचे उमेदवार जाहीर केले, काँग्रेसनेही 12 उमेदवार जाहीर केले पण या दरम्यानच्या काळात कुठल्याही खऱ्या राजकीय चाली न खेळता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी नुसतीच “माध्यमी चाणक्यगिरी” केली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचा एकही उमेदवार अद्याप जाहीर करू शकलेले नाहीत. याला अपवाद फक्त बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा राहिला, पण याच काळात पवार माढ्यामधून “पॉवरफुल खेळी” करणार बीडमध्ये “चाणक्यगिरी” दाखवणार, मराठवाड्यात “शड्डू ठोकणार”, भाजपमधून नेते फोडून त्यांनाच तुतारीवर उभे करणार अशा बातम्यांचे नुसतेच “फटाके” फुटले. पण प्रत्यक्षात पवारांना सुप्रिया सुळे वगळून एकही उमेदवार अद्याप जाहीर करता आला नाही.BJP and Congress takes lead in announcing loksabha candidates, but sharad pawar remains a “paper chanakya”!!



जे पवारांचे झाले, तेच ठाकरेंचेही झाले. उद्धव ठाकरे यांना देखील अद्याप एकही उमेदवार जाहीर करता आलेला नाही. उमेदवारांच्या याद्यांचे पत्ते उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी माध्यमांनीच पिसले आणि त्या याद्या परस्पर तथाकथित सूत्रांच्या हवाल्याने जाहीर केल्या. फक्त पवार आणि ठाकरे यांच्या बातम्या देताना माध्यमांनी एवढा फरक केला की, त्यांनी पवारांना ते “पॉवरफुल खेळी”, “चाणक्यगिरी” “शड्डू ठोकणे’ वगैरे शब्दांची पिसे जोडली, पण ठाकरेंच्या बाबतीत ही पिसे जोडली नाहीत. बाकी दोघांच्याही बातम्या माध्यमांनी भोईनळ्यांसारख्याच उडवल्या. पण या बातम्या ना खऱ्या ठरल्या, ना त्यांची सूत्रे कधी खरे ठरली!!

त्या उलट भाजपने महाराष्ट्रातले 23 उमेदवार जाहीर केले. त्यातल्या 5 खासदारांची तिकिटे कापली, पण त्याची साधी भनकही माध्यमांना लागली नाही. भाजप मधल्या सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी बातम्या दिल्या. त्यापैकी कोणालाही भाजप एकदम एवढे उमेदवार जाहीर करेल आणि 5 खासदारांची तिकिटे कापले याची चाहूलही लागली नाही. दरम्यानच्या काळात काँग्रेसनेही 12 उमेदवार जाहीर केले.

पण त्याचवेळी महादेव जानकर यांना पवारांनी कसे फोडून आपल्या गोटात आणले वगैरे बहारदार वर्णने माध्यमे करत बसली, पण प्रत्यक्षात पवारांनी महादेव जानकर यांना आपल्याकडे खेचून घेऊन महायुतीला धोबीपछाड देण्याऐवजी महायुतीच्या नेत्यांनी पवारांना धोबीपछाड देऊन जाणकारांना आपल्याकडे राखून ठेवले.

पण हे फक्त ठाकरे – पवारांच्याच बाबतीत लागू नाही, तर शिंदे – अजितदारांच्या बाबतीतही तसेच आहे. एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे देखील अद्याप आपल्या पक्षाचे लोकसभेचे उमेदवार जाहीर करू शकलेले नाहीत. त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांची परिस्थिती जरा बरी आहे, कारण त्यांच्याकडे निदान 13 खासदार तरी विद्यमान आहेत. त्यामुळे त्यांना डबल डिजिट जागा मिळण्याची अपेक्षा आहे. अजित पवारांची परिस्थिती मात्र सर्वात बिकट आहे. बारामतीची जागा वगळल्यास बाकी कुठल्या जागा आपल्या राष्ट्रवादीला मिळणार आणि त्यावर आपण कोण उमेदवार उभे करणार हे त्यांच्या अंतर्गत गोटात जरी ठरले असले, तरी ते जाहीर करण्याची हिंमत अजित पवार दाखवू शकलेले नाहीत. कारण भाजप हायकमांड कडून त्यांना तसा ग्रीन सिग्नलच मिळालेला नाही आणि तो ग्रीन सिग्नल आल्याशिवाय उमेदवार जाहीर करणे हे अजित पवारांसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी राजकीय आत्मघात ठरेल हे सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची गरज नाही.

भाजपची 23 तिकिटे जाहीर

त्या उलट भाजपाने 2019 मध्ये 23 जागा जिंकल्या होत्या. त्यानुसार भाजपाने 23 उमेदवार जाहीर केले आहेत. पूनम महाजन यांची जागा वगळता भाजपाने 23 उमेदवारांना लोकसभेचं तिकिट दिले आहे. त्यातून 5 विद्यमान खासदारांची तिकिटं कापण्यात आली आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक, जळगवाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना भाजपाने तिकिट दिले नाही, तर सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी हे भाजपाचे खासदार आहेत. त्यांच्याऐवजी राम सातपुतेंना तिकिट दिले.

विद्यमान खासदारांच्या जागांवर कुणाची वर्णी?

गोपाळ शेट्टींऐवजी पियूष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेचं तिकिट

मनोज कोटक यांच्याऐवजी मिहिर कोटेचांना मुंबई उत्तर पूर्व मधून लोकसभेचं तिकिट

बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडे लोकसभेच्या मैदानात

जळगावमधून उन्मेष पाटील यांच्याजागी स्मिता वाघ यांना तिकिट

सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामींच्या ऐवजी राम सातपुते यांना तिकिट

आत्तापर्यंत भाजपाचे जाहीर झालेले २३ उमेदवार कोण?

१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड – पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित
२१) सोलापूर – राम सातपुते
२२) भंडारा गोंदिया – सुनील मेंढे
23) गडचिरोली चिमूर – अशोक नेते

भाजपाने लोकसभेसाठी 23 नावांची यादी आत्तापर्यंत जाहीर केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसने 12 जणांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यादी मंगळवारी जाहीर केली जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले असले तरी त्या यादी विषयी कोणाला खात्री नाही. पवारांची ही यादी अशीच हवेत आहे. किंबहुना मूळात महाविकास आघाडीतले जागावाटपच नेमके किती??, कुणाला??, कसे देणार??, यावरच खरे घोडे आडले आहे.

BJP and Congress takes lead in announcing loksabha candidates, but sharad pawar remains a “paper chanakya”!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात