नाशिक : महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वगळून बाकी सगळ्या पक्षांनी टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुकीतल्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर ठिक ठिकाणांहून नाराजीचे सूर उमटले, पण त्यातून “बँड” नेमका कोणाचा वाजणार??, आणि त्या तालावर कोण नाचणार??, असा सवाल तयार झाला आहे.A tune of displeasure from BJP, shivsena and NCP and prakash ambedkar, but whom will have to pay the cost??
भाजप, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपापल्या वाट्याला आलेल्या खात्रीच्या जागांवर उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरुवात देखील केली आहे, पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी मात्र “सावध” भूमिका घेत अजून उमेदवार यादी जाहीर केलेली नाही.
पण ज्यांनी उमेदवार यादी जाहीर केली, त्या भाजप, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातून मात्र नाराजीचे सूर उमटले. अमरावतीत भाजपने नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांनी नाराजीचे सूर काढले. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे समर्थक विजय आप्पा करंजकर यांनी नाराजीचे सूर काढले. उद्धव ठाकरे यांनीच सांगलीत चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस मधून विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी नाराजीचे सूर आळवत दिल्ली गाठली.
माढा मध्ये रणजीत सिंह निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटलांचे घराणे नाराजीचे सूर वाजवतच आहे. आता त्या नाराजीच्या सूरांमध्ये तुतारीचा सूर केव्हा आणि कसा मिसळायचा??, याविषयीचा खल सुरू आहे. कारण तिथे धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत. पण शरद पवार धैर्यशील मोहिते यांच्या हातात तुतारी देणार की त्यांना गुंगारा देऊन भलत्याच कोणाच्या हातात तुतारी देऊन मोकळे होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकीकडे शरद पवारांचे आणि काँग्रेसचे काहीच ठरत नसताना उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केले म्हणून बाळासाहेब थोरात आणि शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची बातमी आज तकने दिली.
आता भाजप, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांमधून एवढे सगळे नाराजीचे सूर उमटले खरे, पण त्यातला खरा नाराजीचा सूर प्रकाश आंबेडकरांकडून उमटला. त्यांनी महाविकास आघाडीच्या नादी लागायचे सोडून सरळ मनोज जरांगे यांच्याशी “सामाजिक युती” केली आणि आपले 8 उमेदवार जाहीर करून ते मोकळे झाले. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुतीत कोणीही नाराजीचे सूर काढले असले, तरी प्रत्यक्षात बँड मात्र प्रकाश आंबेडकरांच्या नाराजीच्या सूरांमधूनच वाजणार आहे. आता तो “बँड” नेमका कोणाचा वाजतो आणि त्या तालावर कोण नाचतो??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पण यापुढे देखील आणखी मोठे नाराजीचे सूर निघणार आहेत. कारण अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या “महाराष्ट्र लिमिटेड” पक्षांची उमेदवारी यादी जाहीर व्हायची आहे. त्यांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्या की ठिक ठिकाणी नाराजीचे सूरच नव्हे, तर बँडच वाजण्याची शक्यता आहे. आणि त्या बँडच्या ताफ्यांमधून नेमके कुणाचे प्रत्यक्षात “बँड” वाजणार??, हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App