गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार शपथविधी कार्यक्रमाची खिल्ली उडवताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची एक महत्त्वाची आठवण सांगितली आहे. Yes, trample the MLAs who are defecting, Balasaheb had said … but … !!
पक्षांतर करण्यासाठी जनता देखील थोडी जबाबदार असते. कारण जनतेला माहिती असूनही ते पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांना निवडून देऊन आमदार बनवत असतात. अशा वेळी पक्षांतर करणाऱ्या आमदारांना भर रस्त्यात तुडवा, असे आदेश बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिले होते, अशी आठवण संजय राऊत यांनी सांगितली आहे.
ही आठवण खरीच आहे. बाळासाहेब असे रोखठोक बोलण्यासाठीच प्रसिद्ध होते. किंबहुना मोडा, फोडा, तुडवा हीच बाळासाहेबांची “ठाकरी” भाषा होती. बाळासाहेब कुठलाही आडपडदा न ठेवता आणि कायद्याची भीती न बाळगता जाहीर सभांमध्ये असेच रोखठोक बोलायचे. जनतेला जे मनात वाटायचे ते बाळासाहेब जाहीर बोलायचे. त्यामुळेच त्यांची लोकप्रियता अफाट होती. बाळासाहेबांना गद्दारीची प्रचंड चीड होती. शिवसेनेत राहायचे. शिवसेनेत मोठे व्हायचे. आमदार, खासदार, महापौर, मुख्यमंत्री व्हायचे आणि नंतर उडी मारून दुसऱ्या पक्षात जाऊन मंत्रीपद घ्यायचे या गद्दारीला बाळासाहेबांनी आपल्या जीवनात कधीच थारा दिला नाही. बाळासाहेबांनी शिवसेना स्वतःच्या वक्तृत्वाच्या बळावर आणि कर्तृत्वाच्या बळावर वाढवली.
पण संजय राऊत यांनी सांगितलेली, पक्षांतर करणाऱ्या आमदारांना भर रस्त्यात तुडवा आठवण नेमकी केव्हाची आहे? कशामुळे बाळासाहेब एवढे संतापून पक्षांतर करणारे आमदारांना तुडविण्याची भाषा बोलत होते? तर आज ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून शिवसेना राज्यावर बसली आहे, त्याच शरद पवारांनी एकेकाळी छगन भुजबळ यांच्यासह शिवसेनेचे 18 आमदार फोडले होते. त्यांना त्यापैकी 6 आमदारांना मंत्री केले होते. त्यावेळी बाळासाहेब संतापून आमदारांना भररस्त्यात तुडवा असे म्हणाले होते…!! पक्षांतर करणाऱ्या आमदारांना शिवसैनिकांनी त्यावेळी इंगाही दाखविला होता. छगन भुजबळ यांना आपल्या बेडरुमच्या दिवाणात लपून बसावे लागले होते.
बाळासाहेबांनी पक्षांतर करणाऱ्या आमदारांना तुडवायला सांगितले होते, हे खरेच… पण आपला अख्खा पक्ष युतीतून निवडणूक लढवून महाविकास आघाडीत नेणाऱ्या अख्ख्या पक्षाच्या पक्षांतरावर बाळासाहेबांनी नेमके काय केले असते…?? कारण आमदारांची गद्दारी बाळासाहेबांना मान्य नव्हती, पण अख्ख्या पक्षाच्याच गद्दारीला काय करायचे?, हा प्रश्न बाळासाहेबांच्या वेळी उद्भवलाच नव्हता. म्हणूनच कदाचित आमदारांच्या पक्षांतरावर संतापलेले बाळासाहेब अख्खा पक्षच पक्षांतर करून गेल्यानंतर काय करायचे हे ते बोलले नव्हते का…??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App