Yadagirigutta temple : हल्लाबोल मोदींच्या प्रखर हिंदुत्वावर; पण केसीआर धावताहेत राहुलच्या “टेम्पल रन”सारखे!!


  • यादगिरी गुट्टा लक्ष्मी नरसिंह मंदिराचे धार्मिक विधी करून उद्घाटन!!

देशभरात हिंदुत्वाचा राजकीय प्रभाव एवढा वाढला आहे की विरोधकांनाही एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधत असताना अखेरीस मोदींचेच त्यांना अनुकरण करावे लागल्याचे दिसून येत आहे…!! तेलंगणा मधील यादगिरी गुट्टा येथील लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने याचा आजच प्रत्यय आला आहे. Yadagirigutta temple: Attack on Modi’s intense Hindutva; But KCR is running like Rahul’s “Temple Run” !!

पंतप्रधान मोदी धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतात यात काही नवीन नाही. पण विरोधकही त्यांच्या हिंदुत्वापुढे आपण फिके ठरू नये म्हणून सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग चोखाळताना दिसून आले आहेत. विशेषत: 2019 च्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर हे ठळकपणे दिसायला लागले आहे. याची सुरुवात काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. पण आता या हिंदुत्वाच्या प्रभावाचे राजकीय लोण दक्षिणेत देखील दिसू लागले आहे.



मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा “स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी” अर्थात स्वामी रामानुजाचार्य यांच्या अतिभव्य पुतळ्याचे अनावरण केले त्यावेळी जसे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले तसेच धार्मिक कार्यक्रम आज तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांनी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धार्मिक पावलावर पाऊल टाकत केसीआर चंद्रशेखर राव यांनी यादगिरी गुट्टा येथे लक्ष्मीनरसिंह मंदिराचे उद्घाटन केले आहे. जसे धार्मिक विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी रामानुजाचार्य यांच्या अतिभव्य पुतळ्याचे उद्घाटन करताना केले होते, त्यावेळी अनेक देवतांच्या अर्चनासाठी महायज्ञ करण्यात आले, तसेच महायज्ञ केसीआर चंद्रशेखर राव यांनी लक्ष्मीनरसिंह मंदिराच्या उद्घाटनाच्या समारंभात केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंडू आणि महावस्त्र परिधान करून धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्या वेळी सहभाग घेतला होता. आज केसीआर चंद्रशेखर राव यांनी लक्ष्मीनरसिंह मंदिराच्या उद्घाटन समारंभ देखील मुंडू आणि महावस्त्र परिधान करूनच धार्मिक कार्यक्रम केले आहेत.

– राहुल गांधींचे “टेम्पल रन”

राहुल गांधींनी जेव्हा गावागावांमध्ये जाऊन मंदिरांना भेटी दिल्या देवतांचे दर्शन घेतले त्यावेळी लिबरल मिडियाने त्याचे वर्णन राहुल गांधींचे “टेम्पल रन” असे केले होते. मोदींच्या प्रखर राजकीय हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी राहुल गांधी मंदिरांना भेटी देऊन “सॉफ्ट हिंदुत्वाचा” प्रचार करत असल्याचा दावा लिबरल मीडियाने केला होता.

– केसीआरचे “टेम्पल रन”

आता फक्त राहुल गांधीच सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रचार करताना दिसतात असे नाही तर दक्षिणेतले राज्य तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांनी देखिल “सॉफ्ट हिंदुत्वाचाच” मार्ग पकडल्याचे दिसत आहे. त्यामुळेच भले नरेंद्र मोदी यांना राजकीय दृष्ट्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टार्गेट करत असतील पण त्यांनी अखेरीस राहुल गांधींच्या हिंदुत्वाचा सॉफ्ट मार्ग पकडावा लागला आहे हे आजच्या यादगिरी गुट्टा येथील लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आले आहे.

Yadagirigutta temple : Attack on Modi’s intense Hindutva; But KCR is running like Rahul’s “Temple Run” !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात