विनायक राऊत म्ंहणाले, शेंडी-जानव्याचे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही, ब्राम्हण समाजाने दिला मातोश्रीवर मोर्चा काढण्याचा इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई: शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, असे वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने संताप व्यक्त केला आहे. हिंदू धर्माचा आणिब्राम्हण समाजाचा अपमान केल्याने मातोश्रीवर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे.Vinayak Raut said, “We do not accept the Hindutva of Shendi-Janavya, The Brahmin community warned to form a morcha on Matoshri

औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी शेंडी जाणव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असे संतापजनक वक्तव्य करून समस्त ब्राह्मण समाजाचा व हिंदू धमार्चा घोर अपमान केल्याचा आरोप ब्राह्मण समाज समन्वय समितीने केलाय. शिवसेना पक्षातर्फे व शिवसेनेच्या शिर्षस्थ नेत्यांतर्फे असा उल्लेख करण्याची ही पहिली वेळ नाही.याआधी देखील महाराष्ट्राच्या विधानसभेत जाहीर सभेत तसेच पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा हे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांतर्फे करण्यात आले आहे, असे ब्राह्मण समाज समन्वय समितीने म्हटले आहे.शेंडी-जानव्याचे हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही मग टोपी-बुरख्याचे हिंदुत्व शिवसेनेला मान्य आहे का? शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही पण शेंडी जानव्याचे मतदान शिवसेनेला मान्य आहे

अशी दुटप्पी भूमिका कशी? हा वाक्यप्रचार वापरायचा पायंडा पाडत आहात का?, असे प्रश्न ब्राह्मण समाज समन्वय समितीने शिवसेनेला विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शिवसेनेने ब्राह्मण समाजाला देणे बंधनकारक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: औरंगाबाद शहरात एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ब्राह्मण समाज सदैव शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आहे.

ब्राह्मण समाजाच्या अनेक अंगीकृत संघटना, ब्राह्मण समाजातील अनेक राजकीय नेते शिवसेना पक्षामध्ये वषार्नुवर्षे सक्रिय कार्यरत आहेत. मात्र यापुढे शिवसेना पक्षाला मतदान करताना ब्राह्मण समाजाला विचार करावा लागेल.सर्वप्रथम खासदार विनायक राऊत यांनी संपूर्ण ब्राह्मण समाजाची विनाविलंब जाहीर माफी मागावी अशी आमची प्राथमिक मागणी आहे

अन्यथा ब्राह्मण समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. येणाºया सर्व निवडणुकांमध्ये ब्राह्मण समाज सुज्ञ मतदार म्हणून शिवसेना पक्षावर पूर्णपणे बहिष्कार टाकेल. आम्ही आठ दिवसांचा अवधी देतो जाहीर माफी मागितली नाही तर मातोश्रीवर मार्चा काढू असा इशारा आम्ही आज देऊ इच्छितो, असे समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Vinayak Raut said, “We do not accept the Hindutva of Shendi-Janavya, The Brahmin community warned to form a morcha on Matoshri

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण