एकीकडे ओबीसी आरक्षणाची कोंडी; दुसरीकडे “मराठा मुस्लिम कॉम्बिनेशन” मधून राष्ट्रवादी हात पाय पसरी!!


नाशिक : महाराष्ट्रात नवाब मलिक, अनिल देशमुख, राज्यपालांचे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांविषयीचे वक्तव्य यावरून गदारोळ सुरू असताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र अतिशय विचारपूर्वक पावले टाकताना दिसत आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टापर्यंत ओबीसी आरक्षणाची कोंडी करून दुसरीकडे “एम एम अर्थात “मराठा मुस्लिम कॉम्बिनेशन” मधून संपूर्ण महाराष्ट्रभर हातपाय पसरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इरादा दिसतो आहे. On the one hand, the OBC reservation dilemma; On the other hand, the NCP spread its arms and legs through the “Maratha Muslim Combination” !!

गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीची पावले स्वतःच्या पक्षाचे आर्थिक भांडवलीकरण आणि राजकीय भांडवलीकरण करण्याच्या दिशेने संथपणे पण निश्चितपणे सुरू आहे. आधी राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी वाढवून राष्ट्रवादीने आर्थिक फळी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना आणि काँग्रेसला आमदार निधी वाटपात भरपूर मागे टाकून ठेवले आहे. तर दुसरीकडे अतिशय चतुराईने राजकीय भूमिका घेत ओबीसी आरक्षणाची सुप्रीम कोर्टातून कोंडी करून टाकली आहे. यातून राष्ट्रवादीने भाजपच्या व्होट बँकेला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.

ओबीसी आरक्षणाची कोंडी होत असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी निवडणुका ओबीसी आरक्षणासह होवोत किंवा ओबीसी आरक्षणाविना होवोत अभिना भाजप ओबीसी उमेदवारच अधिक देईल, असे जाहीर केले आहे. यातून त्यांनी देखील ओबीसी आरक्षणाच्या कोंडीतून मार्ग काढल्याचे दिसून येते.पण त्यापलिकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसने विशेष हा पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नवीन “मराठा मुस्लिम कॉम्बिनेशन” तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून ज्या विभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व तोळामासा आहे, तेथे या “मराठा मुस्लीम कॉम्बिनेशन” मधून हात पाय पसरण्याचा त्यांचा इरादा दिसतो आहे. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली नाही, तोच त्यांचा राजीनामा घेणारे पवार नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला मात्र तयार नाहीत. यातूनच “मराठा मुस्लिम कॉम्बिनेशन”कडे त्यांची वाटचाल दिसून येते. त्याच बरोबर मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे यांनी जे उपोषण केले त्यांच्या मागण्या तीन दिवसात मान्य करून महाविकास आघाडी सरकारने विशेषता राष्ट्रवादी काँग्रेसने आपली मराठा व्होट बँक पक्की करण्याचा प्रयत्न केला आहे.

याचाच अर्थ ओबीसी आरक्षणाची सुप्रीम कोर्टापर्यंत कोंडी करून एकीकडे भाजपची ओबीसी व्होट बँक कमजोर करून दुसरीकडे राष्ट्रवादीसाठी “मराठा मुस्लिम कॉम्बिनेशन” अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न दिसतो आहे. अर्थात प्रत्यक्ष मतदानापर्यंत भाजपची ओबीसी व्होट बँक किती कमजोर होईल? आणि राष्ट्रवादीची तथाकथित “मराठा मुस्लीम” वोट बँक कितपत आकाराला येईल हे मात्र येणारा काळच सांगू शकेल.

On the one hand, the OBC reservation dilemma; On the other hand, the NCP spread its arms and legs through the “Maratha Muslim Combination” !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण