मेंदूचा शोध व बोध : मुलांच्या मनातले ओळखा


आपल्या मुलांसाठी, त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी सारेच पालक धडपडत असतात. या बदल्यात त्यांची माफक अपेक्षा असते, मुलांनी त्यांचं ऐकावं! सर्व बाबतीत नाही, निदान जे मुलांच्या भल्याचं सांगतात, तेवढं तरी. पण, मुलं ऐकत नाहीत. बऱ्याचदा ऐकत नाहीत. अभ्यास कर म्हटलं तर करत नाहीत, दंगा करू नको म्हटलं, की हमखास करतात. कसं वागावं मुलांशी, पालकांना कळतच नाही. कौतुक करावं तर शेफारतील का? धाक दाखवावा तर वाटतं, दुरावतील का? हे तर वादातीत आहे, की मुलांच्या संगोपनाची, त्यांच्या शिक्षणाची त्यांच्या विकासाची जबाबदारी पालकांवर असते. ते ती नाकारतही नाहीत, पण ती पार पाडण्यासाठी त्यांच्यात आणि मुलांमध्ये संवाद तर व्हायला हवा. प्रत्यक्षात संवादापेक्षा विसंवादच होताना दिसतो. Identify the minds of children

यावर उपाय काय असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. सुदैवाने या बालक-पालक विसंवादाचं एक महत्त्वाचं कारण आता बालमानसशास्त्रानं शोधून काढलं आहे. डॉ. ऱ्हाइम गिनोट यांनी ते रहस्य शोधून काढलं आहे. ते असं आहे. मुलं जी भाषा बोलतात, ती पालकांच्या भाषेपेक्षा वेगळी असते. डॉ. गिनोट यांनी त्या भाषेला नाव दिलं आहे चिल्ड्रेनीज. जशी चायनीज, जपानीज तशी ही चिल्ड्रेनीज. मुद्दा असा मुलांची ही मुलांची भाषा मोठ्यांना कळतच नसते, त्यामुळं मुलांच्या आणि पालकांच्यामध्ये संवादाऐवजी विसंवाद होत असतो. मुलांची आणि पालकांची बोलण्याची भाषा एकच असते, त्यामुळं शब्द तेच असतात, पण मुलांची परिभाषा वेगळी असते. मुलांच्या भाषेत शब्दांना फारसं महत्त्व नसतं. मुलांना शब्दांच्या अलीकडचं, पलीकडचं, शब्दांच्या मधलं असं खूप काही बोलायचं असतं, जे ती हावभाव, देहबोलीतून व्यक्त करीत असतात. ही मुख्यतः भावभाषा असते. पालकांना ही भावभाषा समजते, असं नाही. त्यामुळं मुलांना म्हणायचं असतं एक, पालक समजतात दुसरं. त्यामुळे मुलांना काय म्हणयाचे आहे ते बिटविन द लाईन ओळखा. त्यांच्याशी भरपूर गप्पा मारा. यातून त्यांच्या मेंदूचीही मशागत होण्यास मदत होते व आपलेही काम सोपे होते.

Identify the minds of children

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात