फडणवीसांचा पेन ड्राईव्ह – राऊतांचा कव्हर ड्राईव्ह; ठाकरेंचा “ईडी गली ड्राईव्ह”…!!


देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह – संजय राऊतांचा कव्हर ड्राईव्ह आणि ठाकरे परिवाराचा “ईडी गली ड्राईव्ह” अशी ट्रायांग्युलर ड्राईव्ह मॅच महाराष्ट्रात सुरू आहे…!! Fadnavis’s pen drive – Raut’s cover drive; Thackeray’s “ED Alley Drive” … !!

देवेंद्र फडणवीस रोज एक पेन ड्राईव्ह काढून फटकेबाजी करत आहेत. त्यावर आज संजय राऊत यांनी नागपूरातल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांच्या घरात रोज एक पेन ड्राइव्ह बाळंत होतो का? बघायला लागेल, असे शरसंधान साधत लक्षात ठेवा आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू, असा इशारा दिला आहे.

पण प्रत्यक्षात मात्र ठाकरे परिवाराचा “ईडी गली ड्राईव्ह” सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे, रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांची 6.50 कोटींची प्रॉपर्टी आधीच ॲटॅच केली आहे. आता बाकीच्या मालमत्ताही ईडीच्या स्कॅनर खाली आल्या आहेत. लवकरच याबाबतचा तपास पूर्ण होऊन प्रत्यक्ष ईडी पुढची कायदेशीर कारवाई करून श्रीधर पाटणकर यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ ठाकरे परिवाराचा ईडी गली ड्राईव्ह सुरू झाला आहे.

– ल्यूक बेनिडिक्ड कोण?

त्यातच किरीट सोमय्या यांनी नवा आरोपाचा बॉम्बस्फोट केला आहे कोण आहे ल्यूक बेनेडिक्ट?, असा सवाल त्यांनी ट्विटरवर करून ठाकरे परिवार आहे. शेल कंपन्यांतून 7 कोटी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला आहेकोण आहे ल्यूक बेनेडिक्ट!? ऑस्ट्रेलियन? उद्धव ठाकरे परिवार म्हणजे आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी आणि ल्यूक बेनेडिक्ट यांना २०१९ मधे विकली. 7 कोटींचा मनी लाँडरिंग व्यवहार केला, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

30 चो

श्रीधर पाटणकर यांची 6.50 कोटी रुपयांची प्रॉपर्टी अटॅच केल्यानंतर ईडीने अजून कोणतीही दुसरी कारवाई केलेली नाही. पण श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीला 30 कोटी रुपये बिनव्याजी कर्ज कुठून मिळाले?, त्याचा सोर्स काय?, असा सवाल विचारणारे नोटीस पाठवली आहे. त्यामुळे ईडीची पुढची कायदेशीर कारवाई श्रीधर पाटणकर यांच्या उत्तरावर अवलंबून आहे. ते उत्तर केव्हा देतात आणि श्रीधर पाटणकर यांच्या बाकीच्या प्रॉपर्टीचा तपास केव्हा पूर्ण होतो?, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तोपर्यंत संजय राऊत नागपुरात पत्रकार परिषद घेत कव्हर ड्राईव्ह मारण्यासाठी झेंडूच्या प्रतीक्षेत आहेत.

Fadnavis’s pen drive – Raut’s cover drive; Thackeray’s “ED Alley Drive” …!!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी