राजस्थानात काॅपीबहाद्दर, पेपर फोडूंवर कठोर कारवाई होणार ; पाच ते दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद


विशेष प्रतिनिधी

जयपूर : राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी संबंधित फसवणूक विरोधी विधेयक गुरुवारी राजस्थान विधानसभेत मंजूर करण्यात आले. स्पर्धात्मक आणि सार्वजनिक परीक्षांमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी या विधेयकात कडक कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत पेपर फुटणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे कॉपी करणे या प्रकरणात दोषी आढळल्यास पाच ते दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच १० लाख ते १० कोटी रुपयांचा दंडही होऊ शकतो. Strict action on paper break,copying in Rajasthan, Provision of imprisonment for five to ten years

कॉपी करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान पेपर कॉपी करताना किंवा खरेदी करताना विद्यार्थी दोषी आढळल्यास त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

राज्यात परीक्षांमध्ये फसवणूक रोखण्यासाठी १९९२ चा कायदा आधीच अस्तित्वात आहे, परंतु यामध्ये दोषींवर कारवाई करण्याचा कोणताही कठोर नियम नाही. मात्र राजस्थान सार्वजनिक परीक्षा विधेयक २०२२ मंजूर झाल्यानंतर असे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. सरकारने आता या नवीन विधेयकात सरकारी भरती, बोर्डासह १० प्रकारच्या परीक्षांचा समावेश केला आहे.नवीन फसवणूक विरोधी विधेयकातील कठोर तरतुदींमुळे पेपर कॉपी किंवा लीक केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास पाच ते दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते. कॉपी करणार्‍या टोळीत सहभागी असलेल्या व्यक्तीला १० लाखांपासून ते १० कोटी रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

पेपर फुटणे आणि कॉपी करणे हा अजामीनपात्र गुन्हा असेल. कॉपी करणाऱ्या टोळीतील लोकांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. कॉपी करताना किंवा पेपर खरेदी करताना उमेदवार दोषी आढळल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाचा दंड होईल. कॉपी करताना दोषी आढळल्यास परीक्षार्थींना दोन वर्षांची शिक्षा होईल.

उमेदवार कॉपी करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्यास १० वर्षांची शिक्षा आणि १० कोटींपर्यंतचा दंड ठोठावला जाईल. अशा प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडूनच केला जाईल. नंतर परीक्षा कोणीही देऊ शकणार नाही.

Strict action on paper break,copying in Rajasthan, Provision of imprisonment for five to ten years

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी