विशेष प्रतिनिधी
मुंबई : शाहरुख खानसोबतच्या परदेश या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री महिमा चौधरी एक सुंद, हुशार आणि गुणी अभिनेत्री आहे. नुकताच तिने हिंदुस्थान टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बरेच शॉकिंग खुलासे इंडस्ट्रीबद्दल केले आहेत.
Mahima reveals shocking things about bollywood
महिमा म्हणते, आधी फक्त व्हर्जिन मुलींना आणि ज्या मुलींनी केस केलेले नाही अशाच मुलींना सिनेमांमध्ये घेण्यासाठी निर्माता दिग्दर्शक प्रेफरन्स द्यायचे. इतकेच नाही तर अभिनेत्रीचे लग्न झाले असेल किंवा ती एखाद्या नात्यामध्ये असेल, अशी थोडीशीही भनक लागली तरी तिला सिनेमातून चक्क काढून टाकले जायचे. आणि ही गोष्ट फक्त अभिनेत्रीनं पुरतीच मर्यादित नसून अभिनेत्यांसोबत सुद्धा असेच व्हायचे. अभिनेत्याचे लग्न झाले आहे हे सांगणे म्हणजे चित्रपटाचे अपयश असा त्यावेळी समज होता.
BOLLYWOOD : ‘थलाईवी’ कंगना रणौतचा मोठा निर्णय ; अभिनेत्रीनं बदललं आपलं नाव…
पुढे ती म्हणाली की, जेव्हा कयामत से कयामत तक हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आमिर खानचे लग्न झाले होते. पण चित्रपटाच्या यशासाठी त्याने ही बातमी मिडीयापासून आणि सर्वांपासून लपवून ठेवली होती. हीच बाब गोविंदा सोबत देखील होती. या दोन्ही अभिनेत्यांची लग्ने झाली होती. पण त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली होती. सध्या इंडस्ट्रीमध्ये जो बदल झाला आहे, तो खूपच कौतुकास्पद आहे. असे देखील ती या मुलाखतीत म्हणाली.
आता लग्न झाल्यानंतरही स्त्रियांना चित्रपटांमध्ये काम मिळते. आणि लोक त्यांचे चित्रपट पाहतात. अभिनेत्री एका मोठय़ा काळासाठी चित्रपटसृष्टीमध्ये करियर करु शकतात. या गोष्टी अतिशय अभिमानास्पद आहेत. आणि हा झालेला बदल खूपच सकारात्मक आहे. असेही महिमा चौधरी या वेळी म्हणाली. महिमाने परदेस, लज्जा, दाग, दिल है तुमहारा, धडकन, बागबाण, कुरुक्षेत्र ह्या सिनेमा मध्ये काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App