केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमूळे कोट्याम मधून 10 जण झाले बेपत्ता


विशेष प्रतिनिधी

तिरुवनंतपुरम : केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे आज मुसळधार पावसाचीदेखील नोंद झाली आहे. हवामान विभागाने केरळच्या पाच राज्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी केला आहे. तर सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पठानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलपुझा, पलककडं, मलप्पुरम, कोझीकोडे आणि वायनाड जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Heavy rainfall in Kerala

केरळ किनारपट्टीवरील दक्षिणपूर्व अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे या क्षेत्रात मध्ये 17 ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत राज्याच्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शविली होती. त्याचप्रमाणे 18 ऑक्टोबर रोजी राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे आणि 19 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत पावसाचा जोर कमी होईल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर आज केरळच्या दक्षिण आणि मध्य भागामध्ये मुसळधार पावसामध्ये अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे आणि नद्यांना पूर आला आहे. या पूरजन्य परिस्थितीमध्ये कोटायाम मधून 10 लोक बेपत्ता झाले आहेत. अशी देखील माहिती मिळाली आहे.


Kerala Corona Cases : देशातील ३० हजार नव्या रुग्णांपैकी १९ हजार एकट्या केरळमधून, २४ तासांत १३२ जणांचा मृत्यू


जोरदार पाऊस झाल्यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ होऊ शकते. नद्या आणि धरणाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री पिनराइ यांनी केले आहे.

Heavy rainfall in Kerala

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात