विशेष प्रतिनिधी
मुंबई: देशभरात ३३ वाहिन्या असलेल्या सन नेटवर्कची ‘सन मराठी’ ही नवी वाहिनी मराठी मनोरंजन विश्वात येणार आहे. २७ ऑक्टोबर पासून ही नवी वाहिनी सुरू होईल. कोरोनामुळे २०१९ मध्ये या वाहिनीला दाखल होता आले नाही. मनोरंजन क्षेत्रातील व्यवसाय वृद्धीसाठी हे चांगले असल्याचे मत व्यक्त होत आहे.
New competitor in Marathi entertainment world- Sun Marathi
सन मराठीच्या येण्याने वाहिन्यांमधील स्पर्धा आता वाढेल. मराठी वाहिन्यांच्या विश्वात नवीन स्पर्धक आल्याने प्रेक्षक संख्याही वाढेल व त्यामुळे जाहिराती वाढतील. याचा व्यवसायवृद्धीसाठी फायदा होईल असे कलर्स मराठी वाहिनीचे व्यवसाय प्रमुख जोशी यांनी म्हंटले आहे.
मराठी वाहिन्यांना जाहिरातीतून ९०० ते ११०० कोटींच्या आसपास उत्पन्न मिळत होते. कोरोना काळात त्यांना चांगलाच फटका बसला व त्यामुळे दोन-तीन महिने जाहिरातीचे उत्पन्न कमी झाले. आता मात्र सर्व सुरळीत झाल्याने पुन्हा एकदा मालिकांचे प्रक्षेपण सुरू झाले. या नवीन स्पर्धकाच्या एंट्रीमूळे मराठी मालिकेच्या पसंतीचे मूल्यांक जे आता १३०० (जीआरपी) इतके आहे, ते आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Bigg Boss Marathi 3 : शिवलीला पाटील बिग बॉसच्या घरातून बाहेर , घरा बाहेर पडण्याचं नक्की काय आहे कारण?
या क्षेत्रातील जाणकारांनी असे मत व्यक्त केले आहे की, सध्या मराठी मनोरंजन मालिकांची उलाढाल ही ९०० कोटींच्या घरात असून ती नवीन स्पर्धक बाजारात आल्यामुळे आणखी वाढेल. यातून वेगळ्या धाटणीचे तसेच दर्जेदार असे आशय असलेल्या मालिकांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येईल. २००३ ते २०१० या काळामध्ये मराठी मालिकांची आर्थिक उलाढाल ही ७० कोटींपासुन ते ४०० ते ५०० कोटींच्या घरात आली आहे. यातून आशयनिर्मिती आणि अर्थकारण हे अधिक गतिमान होईल असे निर्माते नितीन वैद्य यांनी म्हंटले आहे.
सन मराठी ही वाहिनी सहा नवीन मालिकांसह सुरुवात करेल. ‘सुंदरी’, ‘आभाळाची माया’, ‘जाऊ नको दूर बाबा’, ‘नंदिनी’, ‘कन्यादान’ आणि ‘संत गजानन शेगावीचा’ या मालिका प्रसारित होतील. सध्या या मालिका मोफत पाहायला मिळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App