विशेष प्रतिनिधी
मुबंई : आताशा एनसीबी हे नाव आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत झाले आहे. एनसीबी काय काम करते? कोणत्या संदर्भात काम करते? याचीदेखील कल्पना बऱ्याच लोकांना आली असणार. मादक पदार्थांचे सेवन करणे आणि गैरवर्तन करणे या सारख्या समस्या समाजामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत.
Anti Drug Policy! Approval of the Cabinet! The National Action Plan for Prevention of Drug Abuse will be implemented in maharashtra state
या समस्यांचे मुख्य कारण म्हणजेच जीवनशैलीमध्ये झालेला बदल. सोबत मानसिक ताणतणाव, सामाजिक कारणे तसेच बरीच आर्थिक कारणे देखील आहेतच. या धकाधकीच्या आयुष्यात मादक पदार्थांचे सेवन करण्यावर लोकांना कल वाढत चालला आहे. तरुण आणि युवा वर्गाचा यामध्ये प्रामुख्याने नुकसान होत आहे. काही लोक आपल्या प्रॉब्लेम्स मधून एस्केप म्हणून मादक पदार्थांचे सेवन करतात तर काही लोकांची ती आताशा जीवनशैलीच बनली आहे.
Bollywood Drugs Case: NCB ची मोठी कारवाई ! सुशांतचा मित्र तर राज कुंद्रा-शिल्पा शेट्टीच्या रेस्तराँचा डायरेक्टर कुणाल जानीला अटक
म्हणूनच मादक पदार्थांच्या सेवनावर प्रतिबंध घालणे ही आता काळाची गरज बनली आहे. यासंबंधीच्या वैधानिक तरतुदी लक्षात घेऊन नागरिकांचे आरोग्य, त्यांचे पोषण आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मद्यपान, दारू आणि अमली पदार्थांचे सेवन टाळण्यासाठीच्या ‘मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजने’च्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली आहे.
यासोबतच त्यांनी अशीही माहिती दिली की, मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजनेच्या प्रस्तावासह ही योजना राबवण्यासाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता एकूण 2 कोटी 74 लाख व पुढील पाच वर्षांसाठी 13 कोटी 70 लाख रुपये रकमेचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्तावित करण्यात आला होता. तर या संदर्भात 13 कोटी 70 लाख रुपये इतक्या वार्षिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. अशी माहितीदेखील धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App