विशेष प्रतिनिधी
दिल्ली : नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम गती शक्ती’ या राष्ट्रीय योजनेचा शुभारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम राजधानी दिल्लीमधील प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पाशी संबंधित सर्व विभागांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले.
The infrastructure project will now be completed on time, launching the national scheme ‘PM Gati Shakti’
पुढे ते असेदेखील म्हणाले की, ‘देशामध्ये विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू असतात. मात्र अनेकदा या संबंधित खात्यांमध्ये एकमेकांमध्ये कम्युनिकेशनचा गॅप निर्माण झाल्यामुळे बऱ्याच प्रकल्पांना पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो. अनेक प्रकल्प रखडले जातात आणि यामध्ये खर्चाची किंमत देखील वाढत जाते. तेव्हा अशा पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये समन्वय रहावा तसेच या संबंधित सर्व खाती एकत्रितपणे काम करावीत यासाठी पीएम गती शक्ती या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे.’
Modi Government Campaign :वृद्धांना मोफत मेडिकल किटसोबत मोफत तपासणी ; १० ऑक्टोबर पासून सुरु होणार मोहीम
या सुविधेअंतर्गत एकूण 16 विभाग एकत्र काम करतील. कोणत्याही एका प्रकल्पाची माहिती सर्व विभागांना असेल. त्यामुळे कम्युनिकेशनसाठी आणि येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी, वेळेत काम पूर्ण करण्यासाठी, अतिरिक्त खर्च वाचवण्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयोगी आहे. यामुळे देशातील उद्योगांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा पंतप्रधानांनी यावेळी केला. या कार्यक्रमास पायाभूत सुविधांशी संबंधित खात्याचे मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, अश्विन वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे तसेच विविध मंत्री उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App