Modi Government Campaign :वृद्धांना मोफत मेडिकल किटसोबत मोफत तपासणी ; १० ऑक्टोबर पासून सुरु होणार मोहीम


निमित्ताने मोदी सरकार ७५ वर्षांवरील लोकांसाठी मोफत मेडिकल किटचे वाटप करणार आहे.Modi Government Campaign: Free check-ups for the elderly with free medical kits; The campaign will start from October 10


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सुरुवात जोरदार करण्यात येणार आहे. पंतप्रधान जन औषधी केंद्रांचे संचलन करणाऱ्या रसायन आणि औषधे मंत्रालयाने पुढील आठवड्यापासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.या निमित्ताने मोदी सरकार ७५ वर्षांवरील लोकांसाठी मोफत मेडिकल किटचे वाटप करणार आहे.

मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात ८,३०० पंतप्रधान जन औषधी केंद्रे आहेत.याद्वारे १० ऑक्टोबरला देशभरात पसरलेल्या प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांद्वारे हे किट वाटप केले जाणार आहे.याचबरोबर या केंद्रांवर मोफत मेडिकल चेकअप आयोजित केले जाणार आहे.यामध्ये कोण – कोणती औषधे आणि उपकरणे असतील याबाबत पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.



या औषधांच्या किंमती खूप स्वस्त असतात. मोदी सरकारचे २०२२ पर्यंत ८३०० केंद्र उघडण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. आणि ते लक्ष सप्टेंबरमध्येच २०२१ मध्येच ७ पूर्ण झाले आहे.
मोदी सरकारने २०२४ पर्यंत १०,००० केंद्रे उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, प्रतिसाद चांगला मिळत असल्याने मंत्रालय केंद्रांची संख्या वाढविण्याचा विचार करत आहे.सरकारने पुरवठ्यासाठी ३७ वितरकांची नियुक्ती केली आहे.

सध्या ४५० जेनरिक औषधे आणि उपकरणे विकली जाणार आहेत. यामध्ये आणखी काही उत्पादनांची वाढ केली जाणार आहे. यासाठी गुडगाव, चेन्नई आणि गुवाहाटीमध्ये मोठमोठे वेअरहाऊस निर्माण करण्यात आले आहेत. सूरतमध्ये चौथ्या वेअर हाऊसचे काम सुरु आहे.

Modi Government Campaign: Free check-ups for the elderly with free medical kits; The campaign will start from October 10

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात