विशेष प्रतिनिधी
पुणे : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) डीएसके प्रकरणामध्ये जप्त केलेल्या एका बंगल्याचे लैच लॉक आणि सील तोडून सहा लाख 95 हजार रुपयांची घरफोडी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. The burglary took place in the bungalow in the DSK case seized by the ED
सेनापती बापट रस्त्यावरील ‘सप्तशृंगी’ नावाचा बंगला ईडीने जप्त करून त्याला सील ठोकले होते. दोन वर्षांपासून हा बंगला बंद होता. याप्रकरणी भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय 37, रा. मार्बल आर्च, गणेशखिंड रोड, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. भाग्यश्री कुलकर्णी या डी एस कुलकर्णी यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. त्यांचे पती अमित कुलकर्णी हे डीएसके ग्रुप मध्येच काम करतात. भाग्यश्री या गृहिणी आहेत.
गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या डी एस कुलकर्णींच्या अनेक मालमत्ता ईडीने जप्त केलेल्या आहेत. तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून देखील हा तपास सुरू आहे. ईडीने हा बंगला जप्त केलेला होता. 10 ऑक्टोबर 2019 पासून हा बंगला सील ठोकून बंद करण्यात आलेला होता.
भाग्यश्री कुलकर्णी यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना बंगल्यामध्ये चोरी झाल्याचे कळविले. त्यानंतर भाग्यश्री कुलकर्णी यांनी पोलिसांशी संपर्क साधला. यासोबतच ईडीच्या अधिकाऱ्यांना देखील याबाबत माहिती दिली. अधिकारी पोलिस अधिकारी आणि पंचांसमक्ष बंगल्याची पाहणी करण्यात आली. त्यावेळी दरवाजाचे लैच लॉक तोडून सील काढून टाकण्याचे समोर आले. चोरट्यांनी घरामधून 8 एलईडी टीव्ही, तीन कॉम्प्युटर, तीन सीडी प्लेयर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदी, कॅमेरा, गिझर आणि पिठाची गिरणी असा सहा लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App