विशेष प्रतिनिधी
मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एका पान मसाल्यासमवेतचा करार रद्द करत यापुढे अशा प्रकारची जाहिरात करणार नाही, असे जाहीर केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या अधिकृत ब्लॉगवर त्यांच्या कार्यालयाच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की,Amitabh Bacchan rejects panmasala advt.
एका पान मसाल्याची जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी संबंधित ब्रँडशी संपर्क साधला आणि हा करार थांबवत असल्याचे सांगितले. यानुसार संबंधित ब्रँडबरोबरचा करार रद्द केला असून प्रमोशन फिस देखील परत केली आहे.
कराराच्या वेळी संबंधित जाहिरात ही ‘सरोगेट ॲड’असल्याचे ठाऊक नव्हते, असे ब्लॉगवर म्हटले आहे.काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन हे रणवीर सिंह बरोबर पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसले. शाहरुख खान, अजय देवगण यांच्याप्रमाणेच पान मसाल्याची जाहिरात केल्यानंतर बीग बींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App