ADR : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या माहितीनुसार, शिवसेना, आप, द्रमुक आणि जेडीयूसह चौदा प्रादेशिक पक्षांनी 2019-20 मध्ये 447.49 कोटी रुपयांची देणगी इलेक्टोरल बॉण्डद्वारे प्राप्त झाल्याचे जाहीर केले आहे. ADR Reports Donations Of 14 Regional Parties Including Shiv Sena 50 Percent From Electoral Bonds
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या माहितीनुसार, शिवसेना, आप, द्रमुक आणि जेडीयूसह चौदा प्रादेशिक पक्षांनी 2019-20 मध्ये 447.49 कोटी रुपयांची देणगी इलेक्टोरल बॉण्डद्वारे प्राप्त झाल्याचे जाहीर केले आहे.
ही रक्कम या पक्षांच्या उत्पन्नाच्या 50.97 टक्के इतकी आहे. पोल राइट ग्रुपच्या अहवालानुसार, 2019-20 मध्ये देशभरातील 42 प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न 877.957 कोटी रुपये होते.
टीआरएस, टीडीपी, वायएसआर-सी, बीजेडी, डीएमके, शिवसेना, आप, जेडीयू, सपा, जेडीएस, एसएडी, एआयएडीएमके, आरजेडी आणि जेएमए हे त्या 42 पक्षांपैकी 14 क्षेत्रीय पक्ष आहेत ज्यांनी निवडणूक रोख्यांतून देणगी मिळाल्याचे जाहीर केले आहे.
प्रादेशिक पक्षांमध्ये, टीआरएस सर्वाधिक 130.46 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. ही रक्कम सर्व पक्षांच्या एकूण देणगीच्या 14.86% इतकी आहे. शिवसेनेला 111.403 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. दुसरीकडे, वायएसआर काँग्रेसला 92.739 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.
ADR Reports Donations Of 14 Regional Parties Including Shiv Sena 50 Percent From Electoral Bonds
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App