Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) महापंचायतीची घोषणा केली आहे. 26 ऑक्टोबर रोजी किसान मोर्चा लखनऊमध्ये महापंचायत आयोजित करणार आहे. तर 18 ऑक्टोबर रोजी देशभरात रेल्वे रोकोचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबत किसान मोर्चातर्फे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे. Lakhimpur Kheri Violence Sanyukt Kisan Morcha Will Burn Statue of PM Modi And Amit Shah on Dashehara, Calls Rail Roko On Oct 18 and 26 oct Mahapanchayat
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) महापंचायतीची घोषणा केली आहे. 26 ऑक्टोबर रोजी किसान मोर्चा लखनऊमध्ये महापंचायत आयोजित करणार आहे. तर 18 ऑक्टोबर रोजी देशभरात रेल्वे रोकोचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबत किसान मोर्चातर्फे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे.
संयुक्त किसान मोर्चाचे नेते योगेंद्र यादव म्हणाले की, लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या निषेधार्थ 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे पुतळे जाळले जातील. लखीमपूर खेरीच्या घटनेवर शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, 15 ऑक्टोबरला पुतळा जाळला जाईल. 18 ऑक्टोबर रोजी रेल्वे 6 तास रोखण्यात येणार आहे, तर 26 ऑक्टोबरला किसान मोर्चा महापंचायत घेईल.
दरम्यान, लखीमपूर हिंसाचारप्रकरणी आरोपी असलेले आशिष मिश्रा आज सकाळी गुन्हे शाखेसमोर हजर झाले होते. त्यांची बराच काळापासून चौकशी सुरू आहे. विविध पक्षांनी यावरून मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या मुलाच्या अटकेचीही मागणी केली आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर यूपी सरकारने मृतांच्या नातेवाइकांना 45-45 लाखांची भरपाई जाहीर केली होती. काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांकडून या घटनेचा जोरदार निषेध करत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
Lakhimpur Kheri Violence Sanyukt Kisan Morcha Will Burn Statue of PM Modi And Amit Shah on Dashehara, Calls Rail Roko On Oct 18 and 26 oct Mahapanchayat
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App