वृत्तसंस्था
पुणे : बॅंकेतून काढलेले दोन लाख रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवून सलूनमध्ये दाढी करण्यास जाणे उरुळी कांचन येथील एका युवकाला चांगलेच महागात पडले. त्याने डिक्कीत ठेवलेली रक्कम चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची धक्कादायक घटना भर दिवसा घडली आहे. He went to shave and lost Rs 2 lakh; Shocking incident in Uruli Kanchan
उरुळी कांचन येथे शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुनील यादव (वय- २५, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकातील एक्सिस बँकेतून यादव यांनी २ लाख काढले. ही रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयाच्या बाहेर गाडी लावून तो सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेला. दाढी झाल्यावर त्याने दुचाकीजवळ आला. तेव्हा, गाडीची डिक्की उघडी दिसली.
नागरिकांकडे त्याने विचारपूस केली. मात्र कोणीही काही पाहिले नसल्याचे सांगितले. त्यावरून कोणीतरी रोकड लंपास केल्याचे लक्षात आले. त्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुासर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App