पुण्यात शरद पवार यांचा पुतळा हुबेहूब साकारला; शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी केला तयार


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पूर्णाकृती पुतळा पुण्यात साकारला आहे. शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी तो तयार केला आहे.
हा पुतळा धातूचा असून त्याची उंची ९ फूट आहे. पुतळ्यासाठी दीड टन धातूचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी सुप्रिया शिंदे यांना ८ महिने लागले. त्यासाठी त्यांनी त्या दररोज १० तास काम करत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याची पाहणी केली. The statue of Sharad Pawar is created in Pune

खासदार सुप्रिया सुळे यांनी २७ सप्टेंबरला शिंदे यांच्या वर्कशॉपला भेट दिली. तेथील विविध शिल्प पाहून सुप्रिया सुळे अचंबित झाल्या. त्यांनी शिल्पांचे फोटो ट्विट करत माहिती दिली. त्या ट्विटमध्ये म्हणतात, पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमधील काम थक्क करणारे आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्पही त्यांनी साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे.

  • शरद पवार यांचा पुतळा पुण्यात हुबेहूब साकारला
  • पुतळा धातूचा असून त्याची उंची ९ फूट आहे
  • पुतळ्यासाठी दररोज १० तास काम करत होत्या
  • पुतळा बनविण्यासाठी लागले आठ महिने
  • पवार यांचे फोटो आणि व्हिडिओंचा केला अभ्यास
  • खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली वर्कशॉपला भेट
  • शिल्पकलाकृती पाहून झाल्या आंचबित
  • शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी साकारली अनेक शिल्प
  • राजमाता जिजाऊ माँसाहेब, बालशिवाजी यांचे शिल्प

The statue of Sharad Pawar is created in Pune

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात