वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्र वगळता राज्यभरात नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. मात्र त्यासाठी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. Garba allowed in maharashtra except in mumbai
मुंबई महापालिकेच्य क्षेत्रात गरबाला बंदी आली. पण, पण सांस्कृतिक खात्याने राज्यात अन्य ठिकाणी गरबा खेळण्यास परवानगी दिल्याचे टोपे यांनी सांगितले. मोकळ्या मैदानांवर मास्क, सोशल डिस्टन्सिंग चे नियम आयोजकांनी पाळावेत. बंदिस्त सभागृह, हॉलमध्ये क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच प्रवेश देण्याची अट राहील. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी आयोजक व हॉल मालकांची राहील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
नवरात्रोत्सवात मंदिरे खुली होणार आहेत. आता गरबा खेळण्यासही परवानगी मिळाल्याने यंदा नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा होईल. मात्र गरबा खेळण्याची परवानगी मुंबईतही मिळावी, अशी मागणी होत आहे. मुंबईबाबतच भेदभाव का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अटी-शर्ती व नियमांचे पालन करून मुंबईतही गरबा खेळण्यास परवानगी मिळाली, अशी मागणी भाजप आमदार आशीष शेलार यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App