स्थलांतरितांबद्दलच्या ज्यो बायडेन यांच्या धोरणाला झटका, वरिष्ठ सिनेटर एलिझाबेथ मॅकेडोनो यांनी विरोध करत महत्त्वाकांक्षी योजना नाकारली


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे कोणतीही कागदपत्रे नसलेल्यांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या धोरणाला मोठा झटका बसला आहे. त्यांची नागरिकत्वासंदर्भातील महत्वाकांक्षी योजना फेटाळून लावण्यात आली आहे.A blow to Joe Biden’s immigration policy, senior senator Elizabeth Macedono opposes and rejects ambitious plans

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्थलांतरितांबद्दलचे धोरण अद्ययावत करण्याचे आश्वासन जो बायडेन यांनी दिले होते. ते आता प्रत्यक्षात आणणे हा बायडेन यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे.
अमेरिकेतील कित्येक दशके जुनी असलेल्या स्थलांतरितांच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याची व त्याद्वारे कोणतीही कागदपत्रे नसलेल्यांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा करणारी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची महत्त्वाकांक्षी योजना वरिष्ठ सिनेटर एलिझाबेथ मॅकडोनो यांनी फेटाळून लावली आहे.त्यामुळे या प्रस्तावित योजनेला मोठा झटका बसला आहे. १९२९ सालच्या कायद्यानुसार, स्थलांतरितांच्या नोंदणीची प्रक्रिया ठरविण्यात आली आहे. सध्या १९७२ पासून अमेरिकेत असलेल्या स्थलांतरितांनाच नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो. मात्र ही मुदत आता २०१० सालापर्यंत आणून ठेवावी असा डेमोक्रॅटिक पक्षाचा विचार आहे. कारण गेल्या अनेक वर्षांत काही लाख स्थलांतरित अमेरिकेत आले आहेत. त्यांना नागरिकत्व मिळण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

स्थलांतरितांच्या नोंदणी प्रक्रियेत सुधारणा करण्यात येईल. त्यासाठी ३.५ ट्रिलियन डॉलर खर्च करण्यात येतील असे आश्वासन असे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तेथील जनतेला दिले होते. या योजनेला सिनेटमध्ये संमती मिळावी याकरिता बायडेन शथीर्चे प्रयत्न करत आहेत.

अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे असे जगभरातील असंख्य लोकांचे स्वप्न असते. हजारो लोक नोकरीधंद्यासाठी अमेरिकेला जातात पण त्यांना तेथील नागरिकत्व मिळतेच असे नाही. अन्य देशांतून अमेरिकेत अनेक जण बेकायदेशीररीत्या स्थलांतरित झाले आहेत. अशा लोकांकडे फारशी कागदपत्रेही नसतात. ते लोक या देशात वषार्नुवर्षे राहात असून आम्हाला नागरिकत्व द्या अशी त्यांची मागणी आहे.

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्थलांतरितांबद्दलचे धोरण अद्ययावत करण्याचे आश्वासन जो बायडेन यांनी दिले होते. ते आता प्रत्यक्षात आणणे हा बायडेन यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. या धोरणाला रिपब्लिकन पक्षाने नेहमीच कडवा विरोध केला आहे.

अवैधरित्या स्थलांतर केलेल्यांना अमेरिकेतून हुसकावून लावण्याची मोहीम तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांंच्या कारकिर्दीत राबविण्यात आली होती. तेव्हा ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाने विरोध केला होता.

A blow to Joe Biden’s immigration policy, senior senator Elizabeth Macedono opposes and rejects ambitious plans

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”