
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : भारतातील सर्वांत प्रभावी पहिल्या मेथड अभिनेत्यांपैकी एक अभिनेते म्हणजेच शिवाजी गणेशन होय. आज त्यांची 93 वी जयंती आहे. यानिमित्त गुगलने एक स्पेशल डुडल द्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुगलने हे स्पेशल डुडल कलाकार नुपूर राजेश चोक्सी यांच्या कडून बनवून घेतले आहे. विक्रम प्रभू हा गणेशन यांचा नातू आहे. तो ही सध्या इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून काम करतो. त्याने हे डुडल आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. आणि या डुडल आर्टसाठी त्याने गुगल इंडियाचे आणि आर्टिस्ट नुपूर चोक्सी यांचे कौतुक करून आभार देखील मानले आहे. माझ्यासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे असे देखील त्याने यामध्ये मेंशन केले आहे.
Shivaji Ganesan, Google celebrates actors 93rd birthday with special doodle
शिवाजी गणेशन यांचा जन्म तामिळनाडूमध्ये 1928 मध्ये झाला होता. त्यांचे लहानपणीचे नाव होते गणेशमूर्ती पण सिनेमांमध्ये काम करण्यासाठी त्यांनी शिवाजी हे नाव निवडले होते. आपल्या पहिल्याच नाटकात त्यांनी 17व्या शतकातील राजाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांचा चित्रपटातील प्रवास सुरू झाला. 1950 मध्ये ‘पारासक्ती’ या सिनेमातून त्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी जवळजवळ 50 वर्षे चित्रपटांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी एकूण 300 सिनेमांमध्ये काम केलेले आहे.
होय भाई, तुम्ही आम्हाला हसायला शिकवलंत
१९९७ मध्ये त्यांना भारत सरकारने ‘दादासाहेब फाळके’ या पुरस्काराने सन्मानित केले होते. भारतातच नव्हे तर त्यांची ख्याती परदेशामध्ये देखील पसरली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर ते एक लोकप्रिय कलाकार होते. 1960 मध्ये त्यांना इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले होते. ‘वीरप्पन पानगढिया कथाबोमन’ या सिनेमामध्ये त्यांनी एक ऐतिहासिक कॅरेक्टर प्ले केले होते. त्याचसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्याचप्रमाणे 1995 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना ‘नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ या अवॉर्डने सन्मानित केले होते.
Shivaji Ganesan, Google celebrates actors 93rd birthday with special doodle
महत्त्वाच्या बातम्या
- ”मुलांना पार्ले-जी खाऊ घाला, नाहीतर अनर्थ होईल’, अफवेमुळे बिस्किटांचा अचानक वाढला खप, स्टॉकिस्टही झाले हैराण
- Navratri 2021 : मूर्ती विसर्जनावेळी फक्त पाच जणांना परवानगी, बीएमसीने नवरात्रोत्सवासाठी जारी केली नियमावली
- नाशिकमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर ३.५ तीव्रता, केंद्रबिंदू जमिनीच्या ३ किमी आत
- राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर, सरकारकडून लेखी आश्वासनावर ठाम; आपत्कालीन रुग्णसेवा पुरवणार
- Farmers Protest : तुम्ही शहराचा श्वास कोंडत आहात, लोकांनी व्यवसाय बंद करावेत का?, सर्वोच्च न्यायालयाने किसान महापंचायतीला फटकारले