विशेष प्रतिनिधी
काठमांडू : नेपाळने आपल्या जनगणनेत प्रथमच तृतीय लिंग श्रेणीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सचे अधिकारी शनिवारपासून नेपाळमध्ये या निर्णयाची पडताळणी करताना दिसून येत आहेत. 30 दशलक्ष लोकांच्या देशात प्रत्येक घरांना ते भेटी देत आहेत. पुरुष आणि महिलांसोबत “इतर” ही कॅटेगरी लिंग म्हणून निवडण्याचा पर्याय लोकांसमोर ठेवला जात आहे.
Nepal adds third gender category in latest census
नेपाळमध्ये याआधीही समलैंगिकता आणि ट्रान्सजेंडर लोकांच्या हक्कां संदर्भात बरेच प्रोग्रेसिव्ह निर्णय सरकारने घेतले आहेत. 2013 मध्ये नागरिकत्वाच्या कागदपत्रांसाठी तृतीय लिंग ही श्रेणी नेपाळमध्ये सुरू करण्यात आली होती. त्या नंतर 2015 मध्ये “इतर” ह्या श्रेणीचा पासपोर्ट मध्ये समावेश करण्यात आला होता.
औरंगाबाद: किसान कलेक्टर आस्तिक कुमार पांडेय यांचा आणखी एक अभूतपूर्व निर्णय ! तृतीयपंथीयांना महापालिकेत नोकरी
नेपाळ मधील समलिंगी आणि ट्रान्सजेंडर कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार नेपाळमधील एलजीटीबीक्यू समुदाय-अंदाजे 900,000 इतका आहे. तरीही त्यांना भेदभावाचा सामना करवा लागतो. विशेषत: नोकऱ्या, आरोग्य आणि शिक्षण या सारख्या ठिकाणी त्यांना ह्याचा सामना करावा लागतो. एलजीबीटीक्यू कार्यकर्ते असेही म्हणतात की, सरकारच्या डेटाच्या अभावामुळे त्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यात अडथळा निर्माण होतो.
नव्याने होणाऱ्या जनगणने मूळे एलजीटीबीक्यू समुदायास इथून पूढे असे प्रॉब्लेम नाही येनार.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App