विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीचे परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने दुसऱयांदा समन्स पाठवले आहे. 28 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देखील यामध्ये दिले आहेत.
kirit somaiya has tweeted anil parab should attain ED’s Investigation call this time
ऑगस्टमध्ये ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण काही कारणाने ते हजर राहू शकले नाहीत. त्यानंतर ईडीने 30 ऑगस्ट रोजी तीन ठिकाणी छापे मारले होते. यामध्ये परब यांचे निकटवर्ती मानले जाणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे आणि वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांचा समावेश होता. खरमाटे आणि पाटील या दोघांची आठ तास कसून चौकशी ईडीने केली होती. त्यानंतर आता परब यांची चौकशी राहिल्याने त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे असे इडीचे म्हणणे आहे.
अनिल परबांना ईडीची जरब, नव्याने देणार तारीख
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत, ‘आता तरी परब चौकशीसाठी हजर राहतील’ असे म्हटले आहे. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले होते.
सोमय्यांना माहिती कुणी पुरवली? यावरून शिवसैनिकांमध्ये जुंपली :
पण दरम्यानच्या काळात अनिल परब यांच्या घोटाळ्यांविषयी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना नेमकी माहिती कोणी पुरवली? यावरून दोन शिवसैनिकांमध्येच भांडण जुंपले आहे. शिवसैनिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी अनिल परब यांच्या घोटाळ्यांविषयी माहिती पुरविल्याचा आरोप कोकणातील खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडकर यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेत बरीच खळबळ माजली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App