अनिल परबांना ईडीची जरब, नव्याने देणार तारीख


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना नेते अनिल परब सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलावले असता परब यांनी वेळ मागून घेतली. मंगळवारी (31 ऑगस्ट) परब यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र या पहिल्याच नोटिशीनंतर परब यांचे धाबे दणाणले. यानंतर ईडीने त्यांना पुढची तारीख देण्याची तयारी चालवली आहे.Shiv Sena leader Anil Parab is suspected to have amassed immense wealth and taken property from it in the Konkan and Mumbai areas.

सूत्रांनी सांगितले की, यापुढे परब यांच्यासंदर्भातल्या प्रत्येक प्रकरणासाठी त्यांना स्वतंत्रपणे बोलावले जाणार आहे. यामुळे परब यांच्या ईडीतल्या चकरा वाढण्याची शक्यता आहे. ईडीच्या प्रश्नावलीला आणि चौकशीत काही निघू नये


मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती मंत्री अनिल परबांमागे ED पाठोपाठ बढती भ्रष्टाचार चौकशीचे शुक्लकाष्ट


यासाठी परब यांना बरेच कष्ट घ्यावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. परब यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी जोर लावल्याचे सांगितले जाते. यावरुनच राणे यांनीही परब यांना इशारा दिला होता.

मंगळवारी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या परब यांनी ईडीला उत्तरे देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागून घेतली. कोणत्या प्रकरणाची माहिती हवी आहे अशीही विचारणा परब यांनी केल्याचे समजते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ईडी चौकशीमध्ये असाच वेळकाढूपणा केला होता.

परब हेही तीच रणनिती अवलंबत असल्याचे दिसत आहे. याचाच फटका त्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे ईडी चौकशी आणि संभाव्य कारवाईची तलवार परब यांच्यावर दीर्घकाळ टांगती राहिल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या परब यांच्याविरोधात ईडीच्या तीन तक्रारी आहेत. यात मुंबई पोलिसांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याची तक्रार प्रामुख्याने आहे. तसेच एनआयए कोठडीतून निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेने केलेला परब यांचा उल्लेखही त्यांना अडचणीत आणू शकतो.

परिवहन खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या परब यांनी मंत्री म्हणून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा तिसरा आरोप आहे. या संबंधात एका अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे. या शिवाय कोकणातल्या दापोली येथील मालमत्ता, अवैध परवाने, बांधकाम याबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला आहे.

Shiv Sena leader Anil Parab is suspected to have amassed immense wealth and taken property from it in the Konkan and Mumbai areas.

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण