विशेष प्रतिनिधी
लखनऊ: भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याबाबत आनंद गिरी हा संशयित आरोपी आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या जवळचा समजला जाणारा शिष्य म्हणून आनंद गिरी ओळखला जात होता. आनंद गिरी हा वाघंबरी मठाचा उत्तराधिकारी समजला जात होता. परंतु मठाच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता विक्रीतून वाद सुरू झाले.
Life of Anand Giri- One accused in the case of Mahant Narendrea Giri Suicide case
आता नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू बाबत संशयित आरोपी म्हणून त्याला अटक करण्यात आले आहे. नरेंद्र गिरी व त्याची भेट हरिद्वारमध्ये झाली होती. १९९७ मध्ये आनंद गिरी घरातून पळून जाऊन हरिद्वारला पोचला होता. महंत नरेंद्र गिरी यांनी त्याला दीक्षा दिली होती. आणि आनंद गिरी हा त्यांचा पट्टशिष्य बनला होता. आनंद गिरी टिव्ही चैनल वर प्रवचन करीत असे. ते प्रवचन पाहून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला ओळखले. महंत गिरी यांना तो आपल्या गावी घेऊन गेला होता. याच गावात त्याला दीक्षा देऊन त्याचे अशोक हे नाव बदलून आनंद गिरी असे करण्यात आले. नंतरच्या काही वर्षांत त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. वाघबंरी मठाची तीनशे वर्षापूर्वीची मालमत्ता होती. महंत गिरी यांनी मठाची जमीन चाळीस कोटी रुपयाला विकली. तसेच मठाच्या सचिवाची हत्या केली असा आरोप आनंद गिरीनी केला होता. आनंद गिरी फेसबुक पेजचा आधार घेत नरेंद्र गिरींवर आरोप करीत असे. ‘ वुई सपोर्ट आनंदगिरी’ अशा नावाने फेसबुक पेज होते. या पेज वरील एका व्हिडिओमध्ये नरेंद्र गिरी एका शिष्याचे विवाहात नोटा उडवत आहेत असे दिसत होते.
Narendra Giri Case : महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी तिसरा आरोपी संदीप तिवारी यालाही अटक, तपास अधिक तीव्र केला जाणार
आनंद गिरीचे व्यक्तिमत्व छाप पडणारे होते. मध्ये दोन ऑस्ट्रेलियन महिलांची छेड काढल्याचा आरोपावरून सिडनी पोलीसांनी त्यांना अटक केले होते. यावेळी महंत गिरी यांनी त्याची मदत केली होती. या प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता झाली. मठाच्या नावाखाली श्रीमंत व्यापाऱ्यांकडून चार कोटी रुपयांची वसुली केली असा आरोप त्यांच्यावर झाला होता. तसेच मंदिराला दान आलेली रक्कम आपल्या कुटुंबाला दिल्याचा आरोप त्याच्यावर महंत नरेंद्र गिरी यांनी केला व त्याला वाघंबरी मठातून बाहेर काढण्यात आले होते. आनंद गिरीने मठाच्या जमिनीवर पेट्रोल पंप सुरू करण्याचे योजले होते. तसा करारही त्याच्या नावावर झाला होता. नरेंद्र गिरी यांनी खुलासा केला होता की या जमिनीवर पेट्रोल पंप चालणार नाही असे मला समजलेवरून मी तो प्रस्ताव रद्द केला व त्यामुळे आनंद गिरी माझ्यावर नाराज झाला होता. नरेंद्र गिरी यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान मोदी यांना लिहिले होते.
आनंद गिरीने प्रयागराज येथे येऊन नरेंद्र गिरी यांची माफी मागून व त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेऊ असे सांगून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. आखाडा परिषदेने याची दखल घेतली व त्याला नरेंद्र गिरी याना भेटण्यास आखाडा व मठ व्यवस्थापनाने परवानगी नाकारली. सोमवारी भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा मृतदेह अल्लापुर येथील वाघंबरी मठाच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. नरेंद्र गिरी महाराजांनी चिट्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये कोणत्या शिष्याला काय द्यायचे हे लिहिले आहे. शिष्यांच्या वर्तनामुळे मी अत्यंत दुःखी आहे असेही त्यांनी लिहिले आहे. सदर चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. महंत गिरी यांचा व्हिडीओ करून त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत होते. तत्कालीन सरकारमध्ये राज्य मंत्री असलेले समाजवादी पक्षाचे एक नेते या प्रकरणात संशयाच्या भोव-यात आहेत.
पोलिसांनी विविध राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच महंतांच्या सुरक्षा रक्षकांची चौकशी चालू आहे. आनंद गिरी याच्याविरुद्ध महंताना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा जॉर्ज टाऊन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हरिद्वार पोलिसांनी त्याला अटक केली आहे व त्याची कसून चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App