विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पुढील महिन्यात भारतातून अतिरिक्त लशीची निर्यात करण्याची केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी केलेल्या घोषणेचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. यावर्षाखेरीस जगातील सर्व देशांचे किमान ४० टक्के लसीकरण करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या ध्येयपूर्तीच्या प्रयत्नांत हा निर्णय महत्त्वाचा आहे, असे आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेड्स घ्रेबेयेसेस यांनी म्हटले आहे.WHO praised Indias stand on vaccine export
आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दोन दिवसांपूर्वी भारतातून जादा लशींची निर्यात केली जाईल, असे जाहीर केले. अर्थात भारतातील नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे असून त्यानंतरच निर्यात केली जाईल, असे स्पष्ट केले. भारताने एप्रिल महिन्यांत कोरोनाची दुसरी लाट आल्याने लसीची निर्यात थांबविली होती.
जागतिक आरोग्य संघटना आणि गावी-व्हॅक्सिन अलायन्स हे दोघे एकत्र येऊन जगभरातील लसीचे वितरण निश्चिहत करण्याचे काम करत आहे. पण दुसरी लाटेने या संघटनेच्या उपक्रमाला मोठा धक्का बसला. आता आरोग्यमंत्री मंडाविया यांनी म्हटले की, एप्रिलच्या तुलनेत आता लसीचे दुप्पट उत्पादन होत आहे आणि पुढील महिन्यात हेच उत्पन्न चौपट होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App