विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यैप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषणामध्ये काश्मीररच्या मुद्द्याचा उल्लेख केला.‘काश्मी्रचा प्रश्नत चर्चेद्वारे आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये झालेल्या ठरावाच्या चौकटीत राहूनच सोडवायला हवा, ही आमची भूमिका आजही कायम आहे,’ असे त्यांनी भाषणादरम्यान सांगितले.Edrogan once again talked about Kashmir issue
गेल्या वर्षीही संयुक्त राष्ट्रांमधील एका परिसंवादात त्यांनी काश्मीहरचा उल्लेख केला होता. भारताने त्यावेळी एर्दोगान यांच्याकडून असा उल्लेख होणे अमान्य असल्याचे म्हटले होते. पाकिस्तान दौऱ्यातही एर्दोगान यांनी काश्मीमर प्रश्नाहचा उल्लेख केला होता.
दरम्यान एर्दोगान यांनी काश्मीउरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांना शह देताना, सायप्रसबाबत ‘यूएन’च्या सुरक्षा समितीच्या ठरावाचा आदर करणे आवश्येक असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी आज सायप्रसचे परराष्ट्र मंत्री निकोस ख्रिस्तोड्युलिड्स यांची भेट घेतली. सायप्रसमध्ये १९७४ मध्ये लष्करी बंड झाल्याचा फायदा उठवत तुर्कस्तानने तेथे घुसखोरी केली होती. तो वाद अद्यापही चिघळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App