विशेष प्रतिनिधी
चेन्नई : तमिळ सुपरस्टार जोसेफ विजयने आपल्या आईवडील आणि नातेवाईकांविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला आहे. विजय हा चित्रपट निर्माते एसए चंद्रशेखर आणि शोभा यांचा मुलगा आहे. दाखल केलेल्या खटल्यामध्ये विजयने म्हटले आहे की, जाहीर सभा आणि मेळावे आयोजित करण्यासाठी त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या नावाचा कुठेही वापर केला जाऊ नये.
Tamil superstar vijay joseph filed civil lawsuit against his own parents and 9 other relatives
त्याचे झाले असे की, विजेचे वडील चंद्रशेखर यांना राजकारणामध्ये रस असल्याकारणाने त्यांनी एका नवीन पार्टी सुरू करण्याचा निर्णय घेतला. राजकारणामध्ये प्रवेश करण्याची विजयची मात्र अजिबात इच्छा नाहीये. ‘माझ्या नावाचा कोणताही वापर केला जाऊ नये’ असे स्पष्टीकरण विजयने दिल्यानंतरही त्याच्या वडीलांनी म्हणजे चंद्रशेखर यांनी विजयच्या नावावर राजकीय पक्षाची नोंद केली. आपली बायको शोभा हिला या पार्टीचे खजिनदार बनवले तर त्यांचे नातेवाईक पद्मनाभन यांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
अभिनेत्याने खऱ्या हिराप्रमाणे वागावे, कारच्या टॅक्सचोरीप्रकरणी न्यायालयाने सुपरस्टार थलापती विजयला फटकारले
आपल्या निवेदनामध्ये विजयने स्पष्ट केले आहे की, माझ्या नावाने कोणताही पक्ष सुरू करण्याची परवानगी मी देत नाही. आणि त्यामुळे त्याने आपले आईवडील आणि नऊ नातेवाईकावर दिवाणी खटला दाखल केला आहे. 27 सप्टेंबर रोजी या खटल्याची सुनावणी होणार आहे.
जोसेफ विजय ‘मास्टर’ या सिनेमामध्ये दिसला होता. या सिनेमामध्ये त्याने कॉलेज प्रोफेसरची भूमिका साकारली होती. या सिनेमातील ‘वाथि कमिंग’ हे गाणे प्रचंड हिट ठरले होते. नुकताच त्याने ‘बीस्ट’ या तामिळ सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमामध्ये तिच्यासोबत पूजा हेगडे झळकणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App