प्रतिनिधी
सांगली : सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी ठाकरे- पवार सरकारला बुद्धी द्यावी, असे साकडे घंटानाद करून गणरायाला घातले आहे. मदत न करणाऱ्या सरकारचे अनंत चतुर्दशीला विसर्जन कर, अशीही मागणी केली आहे. Bappa, immerse the government on Anant Chaturdashi; Sangli flood victims urges to ganapati by ringing bells
सांगली जिल्ह्यात महापूर येऊन दोन महिने उलटले. मात्र, अद्याप पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही, सरकारने जाहीर केलेलं धान्य मिळविण्यासाठी रेशन दुकानांवर खेटे मारावे लागत आहेत.
पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान, रेशनिंग वरील धान्य, व्यापारी महापूर नुकसानभरपाई अनुदान, शेतकरी महापुर नुकसानभरपाई व ज्यांचे पंचनामे अजून पर्यंत झाले नाहीत. त्याचा निषेध म्हणून आणि राज्य सरकारला सुबुद्धी देण्यासाठी सांगलीच्या गणरायाला साकडे घातले. सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात आले. लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर येत्या अनंतचतुर्दशीला या राज्य सरकारचे विसर्जन कर असे, सकडेही यावेळी घालण्यात आले. या आंदोलनात, पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, हमाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App