लाईफ स्किल्स : व्यक्तिमत्व विकासासाठी परस्परांचा मान ठेवणे फार गरजेचे


स्वतःबद्दल आदर म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे खुलेपणा. तुम्ही मला मान देता तसाच मान सर्वांना द्या, पण माझ्यापासून अपेक्षा करता तशी सर्वांकडून करू नका. बहुतेकदा आपण अनेकदा याच्या उलटे करतो. तुम्हाला सगळ्यांविषयी आदर वाटत नाही. मात्र, त्यांनी तुम्हाला सुख द्यावे, तुमच्याशी चांगले वागावे अशी आशा बाळगता. तुमच्या अपेक्षेनुसार ते वागत नाहीत, तेव्हा तुम्ही नाराज होता आणि त्यांना दोषी ठरवता, त्यांची निंदा करता.Mutual respect is essential for personality development

तुम्ही प्रत्येकाचा मान ठेवलात, तर तेवढीच तुमची किंमत वाढेल. सर्वांचा मान ठेवतो तोच सुज्ञ असतो. व्यक्तिमत्व विकासात याला अनन्यसाधारण महत्व असते. शेवटी व्यक्तिमत्व म्हणजे काय असते. सर्व चांगल्या गुणांचा समुच्चय व्यक्तीमत्वात असणे आवश्यक असते. व्यक्तिमत्व विकासासाठी परस्परांचा मान ठेवणे फार गरजेचे असते. कारण मन दुखावले की पुन्हा त्यात सुधारणा होणे कठीण असते.

तुमची आत्मिक शक्ती वाईट चिंतन केल्यामुळे क्षीण होते. आशीर्वाद दिल्यामुळे तुमची आत्मिक शक्ती विकसित होते. हे जग विभिन्नतेने भरलेले आहे. त्यामुळे मतभेद तर होणारच. धैर्य, सहनशीलता व बुद्धिमत्ता यांच्या योगाने कुशलतेने पुढे जा. मूर्ख लोकांमध्ये राहून तुम्ही ज्ञानी होता. तुम्ही किती आत्मकेंद्रित आहात हे तुमच्या चहूबाजूला असणाऱ्या अज्ञजनांची संख्या सांगते.

मूर्खांना दूर लोटण्याचा प्रयत्न करू नका! तुम्ही केंद्रित नसल्यास त्या अज्ञ लोकांना सहन करण्याचे धैर्यसुद्धा तुमच्यात नसेल. तुम्ही पूर्णपणे आत्म्यामध्ये स्थिर असता तेव्हा तुम्हाला कळून येईल की, मूर्ख लोकसुद्धा ज्ञानी होत आहेत. ते तुमचेच प्रतिबिंब आहे, दुसरे असे कोणी नसतेच. मूर्ख व्यक्ती तुमची निराशा करेल आणि ज्ञानही देऊ शकेल. आपला निर्णय घ्या आणि जीवन रसमय करा.

Mutual respect is essential for personality development

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण