विशेष प्रतिनिधी
मुंबई : गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणाकडे रवाना होत आहेत. चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने गणपती स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. कोकणच्या दिशेने गाड्या रवाना होताच ‘गणपती बाप्पा मोरया…’ असा जयघोष करीत चाकरमान्यांनी जल्लोष केला. ST buses full with ganapati devoters
यंदा महामंडळाने गणेशोत्सवासाठी २२०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या जादा गाड्यांना पसंती दिल्याने अवघ्या काही दिवसांत तब्बल २२११ गाड्या फूल झाल्या. त्यापैकी १०५८ गाड्यांचे ग्रुप बुकिंग करण्यात आले.
सध्या कोकणसह अवघ्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. हे संकटाचे विघ्न लवकरात लवकर निवारू दे आणि एसटीला पूर्वीसारखे चांगले दिवस येऊ दे, असे साकडे विघ्नहर्त्याला घालत मंत्री अनिल परब यांनी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App