गणपतीचे दर्शन मंडपात जाऊन घेण्यावर बंदी; ठाकरे – पवार सरकारची नवी नियमावली


प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दर्शवत ठाकरे – पवार सरकारने गणेशोत्सवावर नवे निर्बंध लादले आहेत. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी ठाकरे – पवार सरकारने नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.  यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा. मंडपात येऊन दर्शन नको. सार्वजनिक मंडळांनी गणपती दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करावी,  असे नियम सरकारने जारी केले आहेत. Level of Restrictions for Breaking the Chain in maharashtra during ganesh festival

गणेशोत्सवासाठी नियमावली

  • गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.  शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी. कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. नागरिक देतील ती वर्गणी स्वीकारावी. सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम घ्यावेत.
  • आरतीभजनकीर्तनात होणारी गर्दी टाळावी. गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी.        
  • श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी फूट आणि घरगुती गणपतीसाठी फुटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर अशा मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे.
  • गणेशोत्सवात देणगी अथवा वर्गणी स्वेच्छेने कोणी देत असेल तरच त्याचा स्वीकार करावा. गणेशोत्सवात जाहिरातींमुळे नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर इतर जाहिरातींपेक्षा आरोग्यविषयक जाहिरातींना प्राधान्य देण्यात यावे
  • विविध सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरासारखे आरोग्यपूरक उपक्रम राबवण्यावर भर द्यावा. तसेच यामाध्यामतून डेंग्यूमलेरियाकोरोना सारख्या आजारांची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी.
  • राज्य सरकारकडून वेळोवेळी लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain चे नियम कायम राहतील. गणेशोत्सवा दरम्यान यामध्ये कोणतीही मोकळीक दिली जाणार नाही.
  • त्याचबरोबर आरतीभजनकीर्तन असा धार्मिक कार्यक्रमांत गर्दी होणार नाही. याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियम आणि तरतूदींचे काटेकोर पालन करावे.
  • श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईनकेबल नेटवर्कवेबसाईट आणि फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.
  • गणपती मंडपांत प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम मास्कसॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
  • श्रींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनास्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळींतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढू नये.  
  • महापालिकाविविध मंडळेगृहनिर्माण संस्थालोकप्रतिनिधीस्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलावांची निर्मिती करावी.

Level of Restrictions for Breaking the Chain in maharashtra during ganesh festival

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात