WATCH : संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव बेळगाववरून देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

विशेष प्रतिनिधी

नागपूर : बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. तर बेळगावात खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय, अशा शब्दात भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले.Ego of Sanjay Raut is defeated in Belgaum corporation election : Devendra Fadnavis

मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये १५ पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही. मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही, असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी राऊतांना दिलंय.महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता. राऊतांच्या या टीकेला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  • बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाला नाही
  • मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही
  • संजय राऊत यांच्या अहंकाराचा मात्र मोठा पराभव
  •  भाजपचे तब्बल १५ मराठी नगरसेवक विजयी
  •  पेढे वाटून विजय साजरा करण्यात गैर काय ?

Ego of Sanjay Raut is defeated in Belgaum corporation election : Devendra Fadnavis