विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष सेवा आणि समर्पण अभियान राबवणार आहे. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते 7 ऑ क्टोंबर पर्यंत हे अभियान सुरु ठेवण्यात येणार आहे. 7 आॅक्टोंबरला नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान अशी मिळून पदाची 20 वर्ष पूर्ण करणार आहेत.BJP’s Seva and Samarpan campaign on the occasion of Prime Minister Narendra Modi’s birthday
नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोंबर 2001 रोजी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत नरेंद्र मोदी हे सातत्याने घटनात्मक पदावर कायम आहेत.
2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून भाजप त्यांचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करते. देशभरात एका आठवड्यासाठी कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करते. परंतु यावेळी ते 20 दिवसांसाठी वाढवण्यात आले. कारण मोदी त्यांचे दोन वर्ष पूर्ण करत आहेत.
या मोहिीमेचा भाग म्हणून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. आरोग्य आणि रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी आणि गरिबांना राशन वाटप करण्यासाठी सूचना केल्या आहेत. कोविड प्रोटोकॉलचे पालन करून कल्याणकारी कामे करावीत असे म्हटले आहे.
सर्व प्रदेश आण जिल्हा मुख्यालयात पीएम मोदी यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या जनकल्याणांच्या कामांबद्दलचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या व्यतिरिक्त नमो अॅपवर ही व्हर्च्युअल पद्धतीने प्रदर्शन असणार आहे. त्याचसोबत पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना मोफत राशन दिले जाणार आहे. याचे वितरण पक्षातील पदाधिकारी आणि जनप्रतिनिधी करणार आहेत. त्याचसोबत पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबीर आणि स्वच्छता अभियान चालवले जाणार आहे.
पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि जनप्रतिनिधी लसीकरण केंद्राला भेट देणार आहेत. प्रत्येक विभागात दिव्यांगांना कृत्रिय अवयव आणि उपकरण सुद्धा दिले जाणार आहेत, तर जिल्हा स्तरावर आरोग्य चाचणी शिबीर सुद्धा चालवले जाणार आहे. देशातील सर्व बुथवरुन नरेंद्र मोदी यांच्याकडून 5 कोटी शुभेच्छापत्र पाठवले जाणार आहेत.
2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त खादीच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रमही राबवला जाईल. तसेच नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्यानुसार 71 नद्या स्वच्छ केल्या जातील. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात 71 ठिकाणी गंगा स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवली जाईल. तर पक्षााकडून अनाथ मुलांसाठी एक विशेष मोहीम देखील चालवली जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App