एअरफोर्सचा निवृत्त अधिकारी अडकला हनीट्रॅपमध्ये, प्रेमाचे नाटक करून 30 लाख रुपयांना लुबाडले

विशेष प्रतिनिधी

पुणे : एअरफोर्समधून निवृत्त झालेल्या ५९ वर्षांच्या अधिकाऱ्याला ‘हनी ट्रॅप’ द्वारे लुबाडण्यात आले . याप्रकरणी चार जणांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. Retired Air Force officer caught in honeytrap, swindled Rs 30 lakh by pretending to love

आरती चौधरी, दत्ता उर्फ यादव कुऱ्हाडे (वय 48 लगडवाडी, जुन्नर), उत्तम कानोजी कुर्हाडे ( वय 40,), नारायण जाधव (वय 37 रा. कैचान मळा, जुन्नर) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरती चौधरी हिची विमान नगर येथे ओळख झाली होती. दोघांनी त्यानंतर एकमेकांसोबत फोन वर आणि चॅटिंग वर बोलणे सुरू केले. या तरुणीने या निवृत्त अधिकाऱ्यांसोबत प्रेमाचे नाटक केले. गोड बोलून त्यांना नारायणगाव येथे सोबत नेले. शेतामध्ये अज्ञात स्थळी नेऊन त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या मुलीचे नातेवाईक तेथे आले.



त्यांनी याठिकाणी काय सुरू आहे अशी विचारणा केल्यावर मुलीने या अधिकाऱ्याने आपल्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध केल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. हे प्रकरण मिटवण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती त्यांच्याकडून 30 लाख रुपयांचे युनियन बँकेचे प्रत्येकी दहा लाखाचे तीन धनादेश जबरदस्तीने लिहून घेण्यात आले. त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. विमान नगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तक्रार दाखल करून घेत आरोपींना तात्काळ अटक केली.

Retired Air Force officer caught in honeytrap, swindled Rs 30 lakh by pretending to love

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात