वृत्तसंस्था
मुंबई : पुणे-मुंबई-पुणे रेल्वेप्रवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुंबई-पुणे मार्गावरील ‘डेक्कन क्वीन एक्स्प्रेस’ला व्हिस्टाडोम डबा जोडला आहे. पहिल्या फेरीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. Vistadom coach housefull of Deccan Queen Express; Travelers enjoy the beauty of nature
‘डेक्कन क्वीन’ एक्स्प्रेसला असलेल्या व्हिस्टाडोम अर्थात पारदर्शक डब्याचे आरक्षण ८ ऑगस्टपासून सुरू झाले होते. ‘डेक्कन क्वीन’ एक्स्प्रेस रविवारी पुण्याहून सकाळी ७.१५ वाजता सुटली आणि सकाळी १०.२५ वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोचली.
या गाडीच्या पारदर्शक डब्याची आसनक्षमता ४० आहे. त्याची सर्व आसने आरक्षित होती. सोमवारीही पुण्यातून येताना हा डबा पूर्ण आरक्षित झाल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. ‘सीएसएमटी’तून सायंकाळी ५.१० वाजता ही गाडी सुटते. मुंबईतून जाणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’च्या या पारदर्शक डब्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही गाडी पुण्याला रात्री ८.२५ वाजता पुण्याला पोचते. वातानुकूलित डबा, काचेच्या मोठय़ा खिडक्या व छत, आरामदायी पुशबॅक खुर्च्या प्रवाशांना सामान ठेवता येईल अशी जागांसह अन्य सुविधा डब्यात आहेत. याआधी डेक्कन एक्स्प्रेसला पारदर्शक डबा २६ जून २०२१ पासून जोडला आहे. या डब्याला ८० ते १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App