प्रतिनिधी
नागपूर – विदर्भातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोणी अडथडा आणत असेल तर काँग्रेस नितीन गडकरी यांच्या पाठीशी आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात भष्टाचार झालाय. कामाचा दर्जा निकृष्ट आहे. ते व्यवस्थित करावे आणि याची श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्याचवेळी नितीन गडकरी यांना मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र दिल्लीच्या दबावातून तर नाही ना, असा टोलाही लगावला.Nana patole targets nitin gadkari and uddhav thackeray for natioanl highway projects
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्र लिहिले आहे. शिवसेनेचे नेते राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळे आणत आहेत, असा गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. दोन जुन्या मित्रांच्या या वादात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काडी टाकून घेतली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोणी अडथडा आणत असेल तर काँग्रेस नितीन गडकरी यांच्या पाठीशी आहे, असे म्हणत पटोले यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.
नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकांची तक्रार केली आहे. या पत्रावर न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की नितीन गडकरी यांनी मुखमंत्र्यांना जे पत्र लिहिले आहे, ते दिल्लीच्या नेत्यांच्या दबावात तर लिहिले नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
कारण, गेली 25 वर्ष शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष सोबत होते. तेव्हा यांना काही अडचण नव्हती. आता वेगळे झाल्यावर त्यांची अडचण वाढली आहे, असा टोला नाना पटोलेंनी लगावून घेतला.या पत्राच्या निमित्ताने दोन जुन्या मित्रांना नानांनी एकाच वेळी राजकीय चिमटा काढून घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App