विशेष प्रतिनिधी
नाशिक : लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर हिला पोलिसांनी अटक केली आहे. आली आहे.रात्री सात वाजल्यानंतर महिला आरोपीला अटक करता येत नाही या कायद्याचा फायदा घेऊन झनकर फरार झाला होत्या.Education officer Vaishali Zankar arrested by police in bribery case of Rs 8 lakh
नाशिकच्या जिल्हा परिषदेसमोर शिक्षण संस्थाचालकांकडून झनकर यांच्या शासकीय वाहनचालकाने आठ लाख रुपयांची लाच झनकर यांच्यासाठी घेतली होती. या प्रकरणात शासकीय वाहन चालक आणि एका शिक्षकाला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
रात्री सातनंतर महिला आरोपीला अटक करता येत नाही या कायद्याचा फायदा घेऊन झनकर यांनी मंगळवारी सकाळी हजर राहू असे लेखी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लेखी दिले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी सकाळी त्या फरार झाल्या होत्या. नाशिकच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी झनकर अर्ज केला होता.मात्र त्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घराची झडती घेतली असता झनकर यांच्या नावावर सुमारे तीन एकर जमीन आणि चार फ्लॅट अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे.शाळांना मंजूर करण्यात आलेल्या 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात एका संस्थेकडून 8 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी डॉ. वैशाली झनकर यांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App