तालिबानी दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानातील गजनी शहरावर ताबा; राजधानी काबूल १५० किलोमीटवर

विशेष प्रतिनिधी

काबूल : तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील गजनी शहर ताब्यात घेतले आहे. हे शहर राजधानी काबूलपासून केवळ १५० किलोमीटरवर असल्याने राज्यकर्त्यांची झोप उडाली आहे. The Taliban have reportedly captured the city of Ghazni located just 150 km from Afghanistan’s capital

गजनी शहरातील प्रमुख मोक्याची ठिकाणे दहशतवाद्यांनी बळकावली आहेत. त्यात सरकारी कार्यालये, पोलीस मुख्यालय आणि कारागृहांचा समावेश आहे. प्रांतीय परिषदेचे प्रमुख नासिर अहमद फाकरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
फाकरी म्हणाले, घुसखोर आणि सरकारी सैनिक यांच्यात या परिसरात चकमकी सुरु आहेत. शहरातील प्रमुख भाग घुसखोरांची बळकावला आहे. लष्कर घा हे सर्वात मोठे शहर ही सरकारच्या हातून निसटले आहे. देशातील एका पाठोपाठ शहरे दहशतवाद्यांनी बळकावली असून आता त्यांची वाटचाल काबूलच्या दिशेने सुरु आहे.


दरम्यान, राष्ट्रपती अश्रफ गणी यांनी आता सर्व भिस्त लष्कर, विशेष दले, नाटो आणि अमेरिकेचे सैन्य यांच्यावर आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे सैन्य महिन्याअखेर अफगाणिस्तानातून काढून घेतले जाणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आता दहशतवादी आणि अमेरिकेच्या सैन्याच्या तडाख्यात सापडले आहे. आताच अफगाणी सैन्याने अनेक ठिकाणी दहशतवाद्यांसमोर गुढगे टेकले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येण्याचा धोका असून सर्वात मोठा धोका हा भारतालाच आहे.

भारताने दिलेले हेलिकॉप्टरवर तालिबान्याचा ताबा

अफगाणिस्तानला भारताने भेट दिलेले MI-24 हेलिकॉप्टर तालिबानने ताब्यात घेतले आहे. भारताने २०१९ मध्ये अफगाण हवाई दलाला अशी ४ हेलिकॉप्टर भेट दिली होती. तालिबानने बुधवारी कुंदुज विमानतळावर हल्ला केला. तेव्हा भारताचे दिलेले MI-24 हेलिकॉप्टर देखील या विमानतळावर होते. तालिबान्यांनीही ते ताब्यात घेतले. मात्र, हे हेलिकॉप्टर उडण्याच्या स्थितीत नाही. कारण अफगाण हवाई दलाने आधीच त्याचे इंजिन आणि इतर भाग काढून टाकले आहेत.

The Taliban have reportedly captured the city of Ghazni located just 150 km from Afghanistan’s capital

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात