मणिपूरचा हा मुलगा त्याच्या उत्कृष्ट रिपोर्टिंगसाठी सोशल मीडियावर फेमस झाला आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या दौऱ्याचे त्याने असे जबरदस्त रिपोर्टिंग केले आहे. After ‘Bachpan Ka Pyaar’ children, now reporting child has become a star, the Chief Minister tweeted and built a bridge of appreciation
विशेष प्रतिनिधी
मणिपुर : सध्या सोशल मिडीयावर बरेच व्हिडीओ वायरल होत असतात. ‘बचपन का प्यार’ हे गाणं म्हणणार्या मुलानंतर आता आणखी एक मुलगा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मुलगा संगीत किंवा नृत्यासाठी नाही, तर त्याच्या एका खास कौशल्यासाठी व्हायरल होत आहे.
खरतर या मुलाने काहीतरी वेगळेच केले आहे. मणिपूरचा हा मुलगा त्याच्या उत्कृष्ट रिपोर्टिंगसाठी सोशल मीडियावर फेमस झाला आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या दौऱ्याचे त्याने असे जबरदस्त रिपोर्टिंग केले आहे, हे पाहून मुख्यमंत्री स्वत:च इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मुलाचा व्हिडिओ शेअर केला आणि त्याचे कौतुकही केले.
Meet my young friend from Senapati who was reporting my visit to the district yesterday to inaugurate the PSA Oxygen plant at Senapati District Hospital.@narendramodi pic.twitter.com/agk5zch4A3 — N.Biren Singh (Modi Ka Parivar) (@NBirenSingh) August 10, 2021
Meet my young friend from Senapati who was reporting my visit to the district yesterday to inaugurate the PSA Oxygen plant at Senapati District Hospital.@narendramodi pic.twitter.com/agk5zch4A3
— N.Biren Singh (Modi Ka Parivar) (@NBirenSingh) August 10, 2021
यासोबतच , मुख्यमंत्र्यांनी या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केले, जेणेकरून मुलाच्या प्रतिभेकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले जाईल. मुख्यमंत्री चंदेल, उखरुल आणि सेनापती या तीन जिल्ह्यांत ऑक्सिजन संयंत्रांचे उद्घाटन करणार होते, जेणेकरून राज्यातील वैद्यकीय ऑक्सिजन पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील. यामुळे त्यांनी सोमवारी सेनापती जिल्हा रुग्णालयाला भेट दिली होती.
हॉस्पिटल मुलाच्या घराजवळ होते आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीची सर्व माहिती जनतेला देण्यासाठी बातमीचा व्हिडिओ त्याने शूट केला. छतावर उभ्या असलेल्या मुलाने प्रथम मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहने कुठे उभी होती हे दाखवले आणि त्यानंतर मुख्यमंत्री आपल्या हेलिकॉप्टरमधून कोठे उतरतील याची माहिती दिली.
दरम्यान, मुलाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की हा ऑक्सिजन प्लांट आपल्याला कोरोना विषाणूशी लढण्यास मदत करेल आणि तेव्हाच मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर खाली उतरले. पुढे हा मुलगा खऱ्या रिपोर्टरसारखे सांगू लागला की येथे आमचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचे हेलिकॉप्टर आहे. बीरेन सिंह जी तुमचे येथे स्वागत आहे. या ऑक्सिजन प्लांटसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत आणि तुम्ही आमच्याकडे परत यावे अशी आमची इच्छा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App