विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे सरकारचे आवडते अधिकारी आणि महारेरा या बिल्डरवर कारवाई करण्याचे अधिकार असलेल्या संस्थेचे चेअरमन अजोय मेहता यांनी बिल्डर अविनाश भोसले यांच्याकडून ५.३३ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याचे उघड झाले आहे.Maharera chairman Ajoy Mehta has bought a flat worth Rs 5.33 crore from Avinash Bhosale’s partner.
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कंपनीत आधी भागीदार असलेले निखिल गोखले यांचा ईडीने जबाब नोंदवला आहे. महारेराचे चेअरमन आणि माजी सनदी अधिकारी अजोय मेहता यांनी नरिमन येथील समता सोसायटीत फ्लॅट विकत घेतला आहे. निखिल गोखले हे अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडचे देखील डायरेक्टर आहेत. त्यांच्याकडूनच अजोय मेहता यांनी नरिमन पॉईंट येथील 1076 चौरस फुटाचा फ्लॅट 5.33 कोटी रुपयात खरेदी केला होता. ईडी अधिकाºयांना याच व्यवहारात संशय आहे.
संबंधित फ्लॅटची किंमत आणि व्यवहारची रक्कम यात विसंगती आहे. त्यामुळे या व्यवहाराबाबत इनकम टॅक्स विभागाला संशय वाटत होता. या व्यवहाराबाबत इनकम टॅक्स विभागाने नोटीस बजावली होती. त्याचबरोबर निखिल गोखले हे अविनाश भोसले यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीत संचालक होते.
अविनाश भोसले यांची ईडीकडून दोन प्रकरणात चौकशी सुरु आहे. एक प्रकरण फेमा कायद्या संदभार्तील आहे तर दुसरं प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे. निखिल गोखले अविनाश भोसले यांच्याशी संबंधित आहेत. त्यांनी अजोय मेहता यांना फ्लॅट विकला आहे. त्यामुळे या व्यवहाराचा देखील अविनाश भोसले यांच्याशी काही संबंध आहे का? या अनुषंगाने देखील ईडीच्या अधिकाºयांना निखिल गोखले यांच्याकडून माहिती घ्यायची होती.
गेल्या काही महिन्यांपासूनपुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित हे ईडीच्या रडारवर आहेत. गेल्याच महिन्यात त्यांची 5 तास चौकशी केली होती. मनी लाँडरिंग प्रकरणात दोघांना ईडीने समन्स पाठवलं होतं. पुणे येथील एका जमीनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे, जी जमीन सरकारी होती. या जमिनीबाबत पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीनेदेखील गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.
अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.
अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. अविनाश भोसले यांच्या एबीज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी 103 कोटी 80 लाख रुपये मोजले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App