वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्र संघ : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या ऐतिहासिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपदावरून सर्व देशांना सागरी सुरक्षेचा सर्वसमावेशक सर्वोत्तम मार्ग सांगितला आहे. त्याचे नामाभिधान देखील त्यांनी केले आहे. ते आहे, “सागर” अर्थात SAGAR : Security and Growth for all in the Region…!! We want to make an inclusive framework on maritime security in our region based on the vision of SAGAR (Security And Growth for All in the Region).
पंतप्रधान मोदींनी “सागर” या संस्कृत शब्दाचा अतिशय चपखल वापर करून या संकल्पनेचा अर्थ सुरक्षा समितीतील सर्व सदस्य देशांना समजावून सांगितला. सागर म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन सर्वसमावेशक आपल्या विभागाचा विकास आणि सुरक्षा करणे होय, हे त्यांनी स्पष्ट केले.
We want to make an inclusive framework on maritime security in our region based on the vision of SAGAR (Security And Growth for All in the Region). This vision is for a safe, secure, and stable maritime domain: PM Narendra Modi at a UNSC High-Level Open Debate pic.twitter.com/ALhVn2SNV6 — ANI (@ANI) August 9, 2021
We want to make an inclusive framework on maritime security in our region based on the vision of SAGAR (Security And Growth for All in the Region). This vision is for a safe, secure, and stable maritime domain: PM Narendra Modi at a UNSC High-Level Open Debate pic.twitter.com/ALhVn2SNV6
— ANI (@ANI) August 9, 2021
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे समितीची ऐतिहासिक बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेसंदर्भात खुली चर्चा open debate झाले. या चर्चेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन, केनिया, काँगो, नायजर या देशांचे राष्ट्रप्रमुख, व्हिएटनामचे पंतप्रधान आदी महत्त्वाचे नेते सहभागी झाले.
या खेरीज सुरक्षा समितीच्या पाच कायमच्या सदस्य सदस्य देशांची प्रतिनिधीही या चर्चेत सहभागी झाले. चीनचे प्रतिनिधी देखील यात सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी सुरक्षेसंदर्भात कोणत्याही एका देशाचे वर्चस्व मान्य नसल्याचे स्पष्ट केले. उलट सागरी संपत्तीवर तसेच सागरी सुरक्षेसंदर्भात सर्व देशांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची त्यांनी जाणीव करून दिली. सर्वांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक विकास आणि सुरक्षा या संकल्पनेवर त्यांनी भर दिला. यातून एक प्रकारे मोदी यांनी चीनच्या सागरी वर्चस्वाला सर्व देश कसे झुगारू पाहत आहेत, याचे उघड संकेत दिले.
हिंदी – प्रशांत Indo Pacific महासागरात दक्षिण चीन समुद्रात चीन आपले नाविक वर्चस्व स्थापन करू पाहत आहे. याचा धोका भारतासह आग्नेय आशियातील देशांना तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका यांसारख्या देशांना आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत open debate घेण्यात आले. त्याला भारताने आधिमान्यता दिली आहे. सुरक्षा समितीचे अस्थायी अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे. त्यामुळे आजच्या open debate ची अध्यक्षता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App